- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने कृषिउत्पादनात वाढ झाली . मात्र शेतीमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. शेतीमालाच्या आयातीचा देखील फटका बसला.जानेवारी २०१७ ते मे २०१७ या पाच महिन्यात कोकणात १, नाशिक विभाग १८१, पुणे ३६, मराठवाडा ३८०, अमरावती ४२६ तर नागपूर विभागात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जून २०१७ मध्ये २१७ शेतकरी आत्महत्या झाल्या. राज्यात २०१५ मध्ये ३ हजार २६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१६ मध्ये हा आकडा ३ हजार ६३ इतका होता. त्यातील पहिल्या सहा महिन्यात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी देण्याची मुख्य मागणी होती. त्यानुसार राज्य शासनाने अलिकडेच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ८५ टक्के आत्महत्या या शेतीवर संपूर्णत: शेतीवरच उपजिविका असलेल्या शेतकऱ्यांनी केल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शेतीवर अवलंबित्व असलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आत्महत्येची आकडेवारी२०१७२०१६जानेवारी२०३२५२फेब्रुवारी२०५२२८मार्च २५७२६७एप्रिल१९०२७६मे २५५२७०जून२१७२४८एकूण१३२७१५४१
राज्यात १,३२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जमाफीच्या निर्णयानंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:46 AM