अकोला, दि. ३१- मागील दोन वर्षांपासून देशी कापूूस उत्पादनाकडे शेतकर्यांचा कल वाढला असून, पुढच्यावर्षी शेतकर्यांना हे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापूस संशोधन प्रक्षेत्रावरील १00 हेक्टरवर देशी कापसाची लागवड केली आहे. विदर्भातील शेतकर्यांनी या कापसाचे प्रात्यक्षिक बघून या कापसाचा पेरा वाढवावा, हा या मागील कृषी विद्यापीठाचा उद्देश आहे. यावर्षी कृषी विद्यापीठाने त्यांच्या मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्र, मध्यवर्ती संशोधन केंद्र, अचलपूर, यवतमाळ, वाशिम व अकोला येथील कापूस संशोधन प्रक्षेत्रावर प्रमाणित, पायाभूत व पैदासकार देशी कापसाची पेरणी केली आहे. हे बियाणे पुढच्यावर्षी शेतकर्यांना पेरणीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होते; परिणामी देशी कापूस बियाणे उत्पादनावर परिणाम झाला होता. या बियाण्याचा निर्माण झालेला तुटवडा बघता, यावर्षी देशी बीजोत्पादनावर अधिक लक्ष देण्यात आले आहे. दरम्यान, बीटी कपाशीचे क्षेत्र वाढले असून, देशी कापूस नाममात्र उरला आहे. तथापि बीटीला तोंड देण्यासाठी कृषी विद्यापीठाने अनेक नवे कापसाचे वाण निर्माण केले असून, पावसाचा ताण सहन करणारे व कमी दिवसात येणार्या कापसाच्या वाणांचा यामध्ये समावेश आहे. अतिघनता लागवड पद्धतीने देशी कापसाचे उत्पादन घेतल्यास बीटी कापसाच्या बरोबरीने उत्पादन येत असून, हा कापूस काढल्यानंतर या क्षेत्रावर दुबार म्हणजेच रब्बी पीक घेता येते. त्यामुळे या कापसाचा पेरा विदर्भात वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. कृषी विद्यापीठाने देशी कापसाचे प्रात्यक्षिक लावण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी कपाशी वाणांचा समावेश आहे. देशी कापसाचा पेरा वाढावा, हा यामागील उद्देश असून, यावर्षी बर्याच शेतकर्यांनी देशी कापसाची पेरणी केली आहे. चालू खरीप हंगामात शेकडो शेतकर्यांची मागणी असताना हे बियाणे उपलब्ध होऊ शकले नाही. - कृषी विद्यापीठाच्या कापूस प्रक्षेत्रावर १00 हेक्टर देशी कापसाची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी प्रमाणित, पायाभूत व पैदासकार बियाणे निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढच्यावर्षी शेतकर्यांना हे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, हा या मागील उद्देश आहे. - डॉ. टी.एच. राठोड, विभागप्रमुख,कापूस संशोधन केंद्र, डॉ.पंदेकृवि, अकोला.
शेतक-यांचा कल वाढला; देशी कापूस फुलला!
By admin | Published: October 31, 2016 11:20 PM