शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

विक्रमगड तालुक्यातील शेतकरी वळला पेरभाताकडे

By admin | Published: July 18, 2016 4:06 AM

तालुक्यातील ८६ गावपाडयातून ७८८७ हेक्टरव कंपन्यांची तयार केलेलया मोठी सुधारीत भातांच्या विविध वाणांची लागवड केली आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- तालुक्यातील ८६ गावपाडयातून ७८८७ हेक्टरव कंपन्यांची तयार केलेलया मोठी सुधारीत भातांच्या विविध वाणांची लागवड केली आहे. परंतु सध्यस्थितीमध्ये शेतीमध्ये नवनवीन बदल होत चालेले असुन त्याअनुशांने काही दोन चार वर्षापासून पावसाचा अनियमीतपणा व शेती साहित्यामध्ये सातत्याने होणारी महागाई यामुळे शेतीकरणे मोठे जिकरीचे होत असल्याने शेतामध्ये लागवडीकरीता केलेला खर्च वसुल होत नसून भातालाही हमी मिळत नाही. यावर उपाय म्हणून आता तालुक्यातील बहुतेक गाव-पाडयांमध्ये काही शेतकऱ्यांनी पावसाळा सुरु होतांच नांगरी करुन त्यामध्ये पेरभाताची पेरणी केली आहे. ही पेरणी पातळ व चार बोटांच्या सुटसुटी अंतराने करुन भाताची रोपे तयार होत आल्यावर त्याची आवणी(लागवड)न करीत पेरभाताची लागवड केलेल्या शेताची बेननी करुन त्यातील गवत काढून फक्त भाताची रोपे शिल्लक ठेवली जातात. तसेच बांधावर आलेल्या गवतावर तननाशक फवारणी करुन गवताला मारले जाते. अशाप्रकारे सुरुवातीला शेलपाडा या महसुली गावातील नारायण पाटील, साईनाथ ढोणे, राजाराम ढोणे यांनी पेरभाताचे लागवडीस सुरुवात केली व त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी केलेला हा प्रयोग जवळ जवळ यशस्वी झाल्याने त्यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले की, जसे आपण भातलगावड करतो त्याचप्रमाणे उत्पन्न मिळते काही फरक पडत नाही उलट खर्चाचे प्रमाण घटुन नफाच होतो. हे पाहून गावातील सर्वच शेतकरी आता पेरभाताची लागवड करु लागले आहे. या गावातील शेतकरीवर्गाने गेल्या दोन-चार वर्षापासून पेरभाताची लागवड केली आहे. व सध्यस्थितीत या भागतील शेतामध्ये दर्जेदार भात रोपे तयार झाली आहेत. पावसाच्या आगमनानुसार तिन प्रकारचे भाताचे उत्पन्न घेतले जाते. प्रथम हळवे भात पिक, त्यानंतर निमगरवे भात पिक व शेवटी गरवार भात पिक या पिकांसाठी त्या त्या कालावधीनुसार लागवड करणे गरजेचे असते.>हळवे भातपीक : हळव्या भातपिकांमध्ये रत्ना, गुजरात-४, कर्जत-३ ही भातपिकांची वाण मोडली जातात. व त्याची लागवड केली जाते. या भातपिकांची पेरभातलागवड केल्यास हे पिक पेरणीपासून शंभर दिवसांत दर्जेदार पिक तयार होते.>निमगरवे भातपीक : निमगरव्या पिकांमध्ये गुजरात-११, गुजरात-१७, ही भातपिकांची वाण मोडली जातात. व त्याची लागवड केली जाते. या भातपिकांची पेरभातलागवड केल्यास हे पिक पेरणीपासुन १२५ ते १३० दिवसांत दर्जेदार पिक तयार होते.>गरवार भातपीक : गरवार भातपिकांमध्ये सुवर्णा,मसुरी,जया ही भातपिकांची वाण मोडली जातात.व त्याची लागवड केली जाते.हया भातपिकांची पेरभातलागवड केल्यास हे पीक पेरणीपासून १२५ ते १६० दिवसांत दर्जेदार पीक तयार होते.>घरातील माणसे पुरेशी येथे लावणी करावयाची गरत नाही. लावणीच्या कालावधीत बेननी म्हणजेच लागवड केलेल्या रोपांचीमधील अनावशक गवत काढून व त्यासाठी बाहेरील मजुरांची गरज न लागता घरातील लोक हे काम करु शकतात.आवणीकरीता होणरा २० ते २५ हजार खर्च येथे वाचतो.त्यामुळे कमी मेहनत व कमी खर्च करुन पेरभातलागवड आज यशस्वी झाली असून येथील अनेक शेतकरी फेर भातलावड करीत आहेत. आज येथील शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्षापासून या प्रकारेच भाताची लागवड सुरु केली असुन आज येथील शेतकऱ्यांची भातरोपे रुबाबदार बहरली आहेत. त्यामुळे खर्च कमी झाला आहे.पेरभात लागवडीने व आताकरीत असलेल्या भातलावडीचे उत्पन्नामध्ये काहीच फरक पडत नाही. उलट पेरभात लागवडीने शेतीसाठी होणारा खर्च कमी होऊन जादा नफा मिळविता येण्यासारखे आहे. - राजाराम ढोणे, कृषी पदविका धारकगेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे दुष्काळी परिस्थिती होते. परंतु शेतकऱ्यांचे कितीही नुकसान झाले तरी शासन त्याचा मोबदला किती देणार शेतकऱ्यांने केलेला खर्चही वसूल होणारा नसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे चिचघरते रत्नदिप पाटील यांनी सांगितले.