अरुण बारसकर सोलापूर : कर्जमाफीसाठी शेतक-यांची नावे सरकारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यात अवघे ११ टक्केच झाले आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे ढोल राज्यकर्ते बडवत असले तरी तांत्रिक कामांना होणारा विलंब लक्षात घेता दिवाळीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने शेतकºयांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. यासाठी थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करावयाचे होते. या कालावधीत ६९ लाख शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकांचे ३६ लाख २३ हजार ६२५ शेतकरी सभासद आहेत. आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकºयांचे विकास सोसायटीच्या सचिव व बँक कर्मचाºयांनी एक ते ६६ कॉलममध्ये माहिती भरावयाची होती. ही माहिती सहकार खात्याच्या लेखापरीक्षकाकडून तपासणी करुन संस्थांनी जिल्हा बँकेकडे आॅनलाइन पाठवायची आहे. संस्थांकडून आलेली माहिती जिल्हा बँकांनी कर्जमाफीच्या लाभासाठी शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. राज्यभरात एकाच वेळी हे काम सुरू असून अपलोड माहिती तपासल्यानंतर निकषात बसत असेल तरच संबंधित शेतकºयाच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.सोमवारपर्यंतच्या माहितीनुसार सोलापूर जिल्हा बँकेने पोर्टलवर ७८८ विकास सोसायट्यांची ८०,०८८ शेतकºयांची तर नाशिक जिल्हा बँकेने ५१२ विकास सोसायट्यांच्या ३८ हजार तर बुलडाणा जिल्हा बँकेने ५०९ विकास संस्थांच्या ११ हजार ५७९ शेतकºयांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे.७० टक्केच लेखापरीक्षणएक ते ६६ कॉलम माहिती भरण्याचे कामही अनेक जिल्ह्यांत अपूर्ण असून, आतापर्यंत सरासरी ७० टक्केच काम झाल्याचे सहकार खात्याकडून सांगण्यात आले.
शेतकरी कर्जमाफीसाठी दिवाळीचा मुहूर्त हुकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:48 AM