- योगेश बिडवई।मुंबई : कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे. कृषी मंत्रालयाने कृषी अधीक्षक व जिल्हा परिषदेचे कृषी विकास व इतर संबंधित अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.बेजबाबदार अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न कृषी विभागाने विचारला आहे. कीटकनाशके हाताळताना विषबाधा झाल्यास त्याची माहिती पाठविण्याची जबाबदारी मुख्य पीक संरक्षण अधिकाºयाकडे असते. कीटकनाशके हाताळण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे आवश्यक होते, तसे घडले नाही.अधिकाºयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली नाही. प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या नाहीत. शेतकºयांच्या मृत्यूची गंभीर घटनाही निष्काळजीपणाने दुर्लक्षित करण्यात आली. विषबाधेनंतर शेतकरी मेळावे, प्रशिक्षण घेण्यात आले नाहीत,असा ठपकाही कृषी विभागाने ठेवला आहे.कृषी यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे ४५० पेक्षा अधिक शेतकºयांना विषबाधा झाल्यानंतरही त्याची योग्य माहिती विभागाला पात्र झाली नाही. त्याचा कोणताही अहवाल न येणे हे गंभीर असल्याचे उपसचिव सु. सं. धपाटे यांनी नोटीशीत म्हटले आहे.यांच्यावर होणार कारवाई?क्रॉपसॅकचे स्काऊटस्, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी गावाला भेट न दिल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याचे नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यवतमाळमधील शेतकरी मृत्यूस कृषी अधिकारी जबाबदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 1:21 AM