शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

फरासखाना स्फोटाचा तपास अधांतरीच

By admin | Published: August 09, 2014 11:34 PM

दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही दहशतवाद विरोधी पथकासह तपास यंत्रणांच्या हातामध्ये ठोस काहीही लागलेले नाही.

पुणो : फरासखाना व विश्रमबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही दहशतवाद विरोधी पथकासह तपास यंत्रणांच्या हातामध्ये ठोस काहीही लागलेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणांच्या आवाक्याबाहेर असल्याचे चित्र आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्ब पेरलेली दुचाकी लावणा:या दहशतवाद्यांची अगदी स्पष्ट छायाचित्रे एटीएसच्या हाती लागली आहेत. या दोघा जणांचा युद्धपातळीवर तपास सुरू असून दहा जणांकडे आतार्पयत कसून चौकशी करण्यात आल्याचे एटीएसच्या एका अधिका:याने सांगितले. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला लागूनच असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी 1क् जुलै रोजी दुपारी 2.क्5 वाजता बॉम्बस्फोट घडवून आणला होता. सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी दादासाहेब रासगे यांची मोटारसायकल क्रमांक (एमएच 11 एनयू 7174) सातारा न्यायालयाच्या आवारामधून चोरण्यात आली होती.  
या मोटारसायकलला डिकी बसवून, त्यात बॉम्ब पेरण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या श्री वडापाव सेंटरच्या मालकीण व कामगारांसह एकूण पाच जण  गंभीर जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. एटीएस व पुणो शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यानंतर शहरातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. यातील बाजीराव रस्ता, सिंहगड रस्ता, भाऊ महाराज बोळ, तुळशीबाग परिसर, स्वारगेट बस आगार आदी भागांतील सीसीटीव्हीत दहशतवाद्यांची छबी टिपली गेली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बॉम्ब ठेवणा:या दोघा जणांची छायाचित्रे तयार करून घेतली आहेत. ही छायाचित्रे अगदी स्पष्ट असल्यामुळे त्याआधारे दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. 
यासोबत फरासखान्यासमोरील कामगार भवनातील सीसीटीव्हीमध्ये मोटारसायकल पार्किगमध्ये लावतानाच,े तसेच बॉम्बस्फोट होतानाचे चित्रीकरण आलेले आहे. सकाळी साधारणपणो सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी बॉम्ब पेरलेली मोटारसायकल लावली होती. बॉम्बची दिशा जमिनीच्या दिशेने असल्यामुळे, तसेच आजूबाजूला मोटारसायकली लावलेल्या असल्यामुळे बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यातील बॉल बेअरिंग, छर्रे अधिक प्रमाणात बाहेर उडू शकले नाहीत. (प्रतिनिधी)
 
4बॉम्ब पेरलेली मोटारसायकल घेऊन दोघे दहशतवादी सिंहगड रस्त्याने पुण्यामध्ये दाखल झाले. फरासखान्याच्या जवळ आल्यानंतर त्यातील एक जण उडी मारून खाली उतरला. त्यानंतर दुसरा दहशतवादी फरासखान्याच्या आवारात मोटारसायकल लावल्यानंतर कानाला फोन लावून बोलत असल्याचे भासवत चालत आला. हे दोघेही चालत तुळशीबाग परिसराकडे गेले. शिवाजी रस्त्याने स्वारगेट बसस्थानकात गेल्यानंतर या दोघांनी थेट कोल्हापूरची एसटी बस पकडून कोल्हापूर गाठल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. 
4एटीएस व शहर पोलिसांसह एनआयए, दिल्ली स्पेशल सेल या स्फोटाचा तपास करीत आहे. तपासामध्ये प्रगती केल्याचे, तसेच लीडवर असल्याचे एटीएसचे अधिकारी सांगत आहेत. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होऊच, अशी खात्री हे अधिकारी देत असले, तरी अद्याप हातामध्ये काहीच नसल्याचे चित्र आहे.