शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

By admin | Published: May 25, 2015 4:02 AM

खेरवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील दुसऱ्या सत्रातील ९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सत्रातील २२५ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना २०१०-२०११ पासून अतिरिक्त कामांचे सुमारे

मनोहर कुंभेजकर, मुंबईखेरवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील दुसऱ्या सत्रातील ९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सत्रातील २२५ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना २०१०-२०११ पासून अतिरिक्त कामांचे सुमारे २.२५ कोटी वेतन मिळालेले नाही. प्राचार्य डॉ.एच.पी.चासकर आणि प्रशासकीय अधिकारी पी.पी.वाणी यांच्यामुळे हे वेतन रखडले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर वेतनापोटी आलेले सुमारे ७५ ते ९५ लाखांचे अनुदान आणि २०१४-१५ मधील १ कोटी १८ लाख रुपये प्राचार्यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेले. त्यामुळे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, या असंतोषामुळे दुसरे सत्र बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्थेतील प्रथम सत्रासह सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतनदेखील विलंबाने होत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालून देय असलेले अनुदान आणि थकीत वेतन देण्याची विनंती उपप्राचार्य प्रा. राजेंद्रकुमार बऱ्हाटे यांनी केली आहे. तसेच येथून इतर ठिकाणी बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची थकबाकी नवीन आस्थापनांवर प्रदान करण्याची कोणतीही तरतूद सध्या राज्यात अस्तित्वात नसल्याचेही बऱ्हाटे यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यालयातील धुरी या महिला कर्मचाऱ्याचे वेतन सात महिने रोखून धरले होते.