पुणो : न:हे येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत केवळ नशीब बलवत्तर म्हणून आठ कुटुंबांचे प्राण आज वाचले. इमारत कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याने तसेच आसपासच्या इमारतींमधील नागरिकांनी आराडाओरडा केल्याने या इमारतीमधील 15 ते 2क् रहिवाशांना आपला जीव वाचविता आला.
4विशेष म्हणजे, इमारत कोसळण्यापूर्वी काही मिनिटे अनेकांच्या घरांचे दरवाजे कोसळणा:या भिंतीमुळे अडकले होते. अशा स्थितीत समोर मृत्यू उभा असतानाही या इमारतीमधील नागरिकांनी मोठय़ा हिमतीने दरवाजे तोडून बाहेर पडण्याची हिंमत दाखविली त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे चित्र होते. मात्र, पै न् पै उभा करून अवघ्या वर्षभरापूर्वी, तर काहींनी महिन्याभरापूर्वी या इमारतीत थाटलेला संसार मात्र या दुर्घटनेत उद्ध्वस्त झाला आहे.
4अवघ्या दीड वर्षापूर्वी व्ही.के असोसिएट्सच्या वतीने पिताराम कॉम्पलेक्स या नावाने ही सहा मजली इमारत बांधण्यात आली होती. ही इमारत या ठिकाणी असलेल्या खाणीच्या ठिकाणी मुरूम भरून दीड गुंठा जागेत उभारण्यात आली आहे. त्यात सुमारे 2क् फ्लॅट असून खालच्या मजल्यावर व्यावसायिक मिळकती होत्या. या इमारातीत सहा महिन्यांपासून नागरिक राहावयास येत होते. या इमारतीत दुर्घटनेच्या रात्री आठ कुटुंबे होती. त्यात 2 स्वत: घरमालक, तर 6 भाडेकरू होते.
माहिती असूनही केले दुर्लक्ष
4ही इमारत कोसळण्याच्या मार्गावर असल्याची कुणकुण लागूनही या इमारतीमधील रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही घटना घडण्याच्या एक दिवसपूर्वीच ही धोकादायक इमारत खाली करणो शक्य झाले असते. इमारतीच्या पायाच्या कॉलमवर मर्यादेपेक्षा जास्त वजनाचा भार पडत असल्याने गुरुवारी दुपारी अनेक घरांच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याची माहिती याच इमारतीत कार्यालय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली होती.
4त्या व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी केवळ त्या भेगांची पाहणी करून ‘उद्या दुरुस्त करून देतो,’ असे सांगितले. त्यामुळे रहिवाशांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा तडा रात्री अडीच्या सुमारास अचानक वाढल्या आणि कॉलम फुटू लागल्याचे मोठे आवाज झाले. त्यामुळे भूकंप झाल्याचे गृहीत धरून हे रहिवासी घराबाहेर पळत सुटले; मात्र वरील स्लॅबचे वजन खाली येऊ लागल्याने त्यांचे घराचे दरवाजेही बंद झाले होते. त्यामुळे मिळेल त्या वस्तूने दरवाजे तोडून हे नागरिक बाहेर पडले आणि अवघ्या काही मिनिटांत ही इमारत कोसळली.
गुरुवारी
दुपारी 2 वा - इमारतीला
भेगा पडण्यास सुरुवात
4 ते सायं. 6 - रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकाला दिली माहिती
6 ते रात्री 8 - बांधकाम व्यवसायिकांच्या कर्मचा:यांनी
केली पाहणी
शुक्रवार
पहाटे 2.3क् - इमारतीचे
कॉलम फुटण्यास सुरुवात
2.45 - आवाजामुळे
परिसरात घबराट
3 - स्थानिक नागरिकांचे पोलीस, अग्निशामक दलला फोन
3.15 - अग्निशामक दल, अॅम्ब्युलन्स सेवा घटनास्थळी दाखल
3.2क् - पोलीस आणि स्थानिकांचे मदत कार्य
4 - एनडीआरएफचे पथक दाखल बचावकार्य सुरू
सकाळी 8 - महापौर,
उपमहापौर, घटनास्थळी
सकाळी 1क् - आमदर, खासदार, राजकीय प्रतिनिधी घटनास्थळी
सायंकाळी 5 : पार्किगमध्ये अडकलेल्या युवकाचा शोध.