शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

पित्याच्या मृत्यूचे दु:ख सारून मुलाने दिली परीक्षा!

By admin | Published: March 03, 2016 2:24 AM

पेपर सुरू होण्यापूर्वी पितृछत्र हरविले.

जउळका रेल्वे (जि. वाशिम) : दहावीची परीक्षा सुरू होण्याच्या १४ तासांपूर्वी पितृछत्र हरविले अन् दुखाचा डोंगर कोसळला, तरीही डोळय़ातील अङ्म्रूंना तसेच साठवून ठेवत त्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता परीक्षा केंद्र गाठले. एकीकडे तीन तास तो मराठीचा पेपर सोडवितच होता, तर दुसरीकडे त्याच्या पित्याला चिताग्नी दिल्या जात होती. पित्याचे स्वप्न शिक्षणाच्या माध्यमातून सत्यात उतरवू पाहणार्‍या उडी ता. मालेगाव जि.वाशिम येथील रहिवासी व जउळका रेल्वे येथील शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी शैलेश विनोद घुगे याने दु:खाला धैर्याने तोंड कसे द्यावे, याचा परिचय आपल्या कृतीतून करून दिला. १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. उडी येथील विनोद भिकाराव घुगे यांचा अनिकेत नावाचा एक मुलगा १२ वीची परीक्षा देत होता तर लहान मुलगा शैलेश दहावीची परीक्षा देणार होता. वर्षभर परीक्षेसाठी घेतलेले परिङ्म्रम व यशस्वी होण्याची स्वप्ने उराशी घेऊन शैलेश २९ फेब्रुवारीला परीक्षेत चांगले गुण मिळविण्याच्या इच्छेने उत्साहीत होता; परंतु त्याच रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याच्या पितृछत्रावर काळाने घाला घातला. हृदयविकाराच्या झक्क्याने विनोद घुगे यांचे निधन झाले. उद्या परीक्षा अन् अशातच वडिलांचा मृत्यू झाल्याने शैलेषसमोर काय करावे, हा प्रश्न उभा ठाकला. एककीडे पितृछत्र हरविल्याचे दु:ख तर दुसरीकडे आयुष्यात यशस्वी होण्याची पहिली पायरी.. अखेर आपले दु:ख बाजूला सारुन शैलेशने वडिलांची शिक्षण घेऊन मोठं होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंबातील सर्वांनी याला संमती दिली. सकाळी ११ वाजता परीक्षेची वेळ व नेमकी तीच वेळ त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी निवडल्या गेल्याने अंत्यविधीला हजर न राहता त्याने परीक्षा केंद्र गाठले व पेपर सोडविला.