: बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे उचलले पाऊल नागपूर : बेरोजगारी आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक महिन्यापासून मानसिक तणावात जगणाऱ्या एका व्यक्तीने अडीच वर्षाच्या चिमुकलीसह गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे घडलेली ही घटना सकाळी ७ नंतर चर्चेला आली. महेश रामकृष्ण भांदककर (वय ४२) आणि अदिती (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. महालमधील संघ बिल्डींगच्या मागे भांदककर परिवार राहतो. महेशचे वडील वायुसेनेचे निवृत्त कर्मचारी असून, आई गृहिणी आहे. महेशचा नरेश नामक भाऊ वकील असून, ते जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतात. मेकॅनिक असलेल्या महेशचे संगीता (वय ३०)सोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी तो एका बँकेत रोजंदारीवर (डेलीवेजेस) कामावर होता. वर्षभरापूर्वी त्याला कामावरून कमी करण्यात आले. काही दिवस घरोघरी जाऊन गृहोपयोगी साहित्याची तो विक्री करीत होता. मात्र, त्यात त्याला स्वारस्य नसल्याने त्याने नंतर हे काम बंद केले. महेश रिकामाच राहत असल्याने घरातील खर्च चालविण्यासाठी संगीता गृहोपयोगी साहित्याची विक्री करून परिवाराचा गाडा रेटण्याचे प्रयत्न करायची. वारंवार सांगूनही महेश रोजगार शोधण्याचे नाव घेत नसल्याने त्याचा पत्नीसोबत नेहमीच वाद व्हायचा. आईवडील आणि भाऊसुद्धा त्याची समजूत काढून त्याला रोजगार शोधण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. मात्र, तो त्यांनाही उलटून बोलायचा. त्यामुळे त्यांच्यासोबतही त्याचा वाद व्हायचा.महेशचे भाऊ नरेश यांचे १९ एप्रिलला लग्न झाले. त्यामुळे घरात आनंदीआनंद होता. गुरुवारी बहुतांश पाहुणे निघून गेले. केवळ एक विवाहित बहीण मुक्कामी होती.
पित्याने चिमुकलीसह घेतली तलावात उडी - नागपुरातील घटना
By admin | Published: April 23, 2016 5:04 AM