शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पित्याने आवळला नवजात मुलीचा गळा?

By admin | Published: October 07, 2016 5:50 AM

नवरात्रौत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मात्र क्रौर्याने परिसीमा गाठली

यवतमाळ : नवरात्रौत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मात्र क्रौर्याने परिसीमा गाठली. जन्माला आलेल्या जुळ््या मुलींपैकी एकीचा त्यांच्या पित्यानेच गळा आवळून जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उमरखेड तालुक्याच्या चिल्ली येथील एक महिलेने सोमवारी पहाटे ६.१५ वाजता जुळ्या मुलींना जन्म दिला. पहिल्यांदा जन्माला आलेल्या मुलीचे वजन कमी होते. तिला बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र पित्याने तिला उपचारासाठी नेण्यास नकार दिला. तसे लेखीही डॉक्टरांना दिले.सोमवारी रात्री वजनाने कमी असलेल्या मुलीला नर्सने बालरोग विभागात नेण्याचा सल्ला दिला. तेव्हा पिता आणि आजी त्या मुलीला घेऊन बालरोग विभागात गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषित केले. चिमुकलीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी मात्र निश्चित केला नाही. जन्मदात्यांवरच पोलिसांचा संशय असून पाठोपाठ झालेल्या मुलींमुळेच हे कृत्य केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत. (प्रतिनिधी) मुलगी झाल्याने विवाहितेचा खूनकसबे तडवळे (जि. उस्मानाबाद) : मुलगी झाल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा गळा अवळून खून केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरूध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही खळबळजनक घटना बुधवारी उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी शिवारातील सटवाई खोरी पारधी पिढीवर घडली़शीतल शंकर काळे (२०) हिला तिचे सासरे धनु गोर्वधन काळे, पती शंकर व नणदेचा नवरा सुखदेव शिवाजी पवार हे सतत शारीरिक, मानसिक जाच करीत होते़ मुलगी झाली म्हणून बुधवारी रात्री ८च्या सुमारास या तिघांनी दोरीने गळा अवळून शीतलचा खून केल्याची फिर्याद कल्याण भीमराव शिंदे यांनी ढोकी पोलीस ठाण्यात दिली़ त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही गजाआड केले आहे़