ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 - मंगेश शिंदे, सुजित भोकरे व नील संघवी यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर ग्रीन बॉक्स चेतक एफसी संघाने डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेतील सुपर डिव्हिजन गटात फातिमा इलेव्हन संघाचा ३-०नी पराभव करून आगेकूच केली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने लोणी येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात इंद्रायणी एफसी संघाने आर्यन्स एससी संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. इंद्रायणी एफसीकडून कवी बक्षी व आर्यन्स एससीकडून सुमीत शिंदे यांनी प्रत्येकी एक गोल केला. सिटी क्लब व मिश्चिफ मेकर्स यांच्यातील चुरशीचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. अन्य एका लढतीत मंगेश शिंदे, सुजित बोकरे व नील संघवी यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलाच्या जोरावर ग्रीन बॉक्स चेतक एफसी संघाने फातिमा इलेव्हनचा ३-० असा सहज पराभव केला. सविस्तर निकाल : सुपर डिव्हिजन गट : साखळी फेरी :इंद्रायणी एफसी : १ गोल (कवी बक्षी २५वे मि. पास- सुजित नायर) बरोबरी वि. आर्यन्स एससी : १ (सुमीत शिंदे ५०वे मि. पास- विशाल निकम); सिटी क्लब : ० बरोबरी वि. मिश्चिफ मेकर्स : 0; ग्रीनबॉक्स चेतक एफसी : ३ (मंगेश शिंदे ११वे मि., सुजित बोकरे १५वे मि. पास-रोहित घाग, नील संघवी ६३वे मि. पास- गौरव जाधव) वि.वि. फातिमा इलेव्हन : ०.
चेतक एफसीकडून फातिमा इलेव्हन ३-० गोलनी पराभूत
By admin | Published: June 21, 2016 6:12 PM