अगदीच फेव्हरेट विचाराल तर ते वरण-भातच आहे, असे फडणवीस सांगतात़ गोड फारसं आवडत नाही़ खारे पदार्थ मात्र ते आवडीने खातात़ रात्री मात्र मुरमुरे नियमित खातात. संगीत हे बेस्ट स्ट्रेस रिलिफर आहे, ही गोष्ट फडणवीसांनाही मान्य आह़े म्हणूनच ते वेळ मिळेल तेव्हा त्यांचे आवडते गायक किशोर कुमार यांनी गायलेले गीत ऐकत असतात़ याशिवाय कुमार शानू, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती हे तिघे सुद्धा त्यांचे आवडते गायक आहेत़
खेळामध्ये देवेंद्र यांना टेनिस, फुटबॉल, हॉकी हे खेळ बघायला, तर क्रिकेट खेळायला आवडत़े फुटबॉल वर्ल्ड कपमधील सामने तर त्यांनी रात्र रात्र जागून बघितले आहेत़
प्रवास : प्रवास करणो हा फडणवीसांचा आवडता छंद आह़े जसे शक्य होईल तसे ते आपल्या खासगी वाहनाने फिरायला जातात़ ड्रायव्हिंग आवडत असल्याने गाडीही स्वत:च चालवतात़
मनोरंजन
हिंदी गाण्यांचे कार्यक्रम, एकपात्री प्रयोग, कवी संमेलन, मुशाय:यांमध्ये फडणवीस अधिक रमतात़ पार्टीला जायला त्यांना आवडत नाही़ खासकरून जेथे मद्य घेतेले जाते अशा कार्यक्रमांत ते जायचे टाळतात. पार्टीत रस नसला तरी एखादवेळी खुल्या रेस्टॉरंटमध्ये मित्रंसोबत जेवायला ते कधीही तयार असतात़
कपडे : कपडय़ांचे विचाराल तर पॅण्ट-शर्ट हाच त्यांचा आवडता पोषाख आह़े त्यातही सर्वच गडद रंग त्यांना जाम आवडतात़ अलीकडच्या काही वर्षात ते विविध रंगांची नेहरू ज्ॉकेट घालतात.
चित्रपट : आधी ते खूप चित्रपट बघायच़े परंतु राजकारणातील व्यस्तता वाढल्यामुळे आता वेळ मिळत नाही़ परंतु जाने भी दो यारो यासारखे लाइट कॉमेडी चित्रपट फडणवीसांना निखळ आनंद देतात़
पुस्तक : पुस्तकं आजही त्यांच्या जिवाभावाची मित्र आहेत़ विशेषत: ऐतिहासिक कांदब:या. परंतु राजकारणात आल्यामुळे त्यांच्या वाचनाचे विषय बरेच बदलले आहेत़ यात आता कायदे, तंत्रज्ञान, आर्थिक धोरण अशा विषयांचा समावेश झाला आह़े प्रामुख्याने स्वामी विवेकानंदांवर आधारित पुस्तके आणि अर्थशास्त्रची पुस्तके वाचनाचा छंद आहे.