शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर एफडीएची करडी नजर, खाद्यतेल, गुटख्याचा २५ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:17 AM

अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला

- जयंत धुळपअलिबाग : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांनी दिली आहे.दिवाळी सणाच्या कालावधीत रायगड अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम आखून, अन्न नमुने घेणे, अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६अंतर्गत विश्लेषण करणे, खाद्यपदार्थ विक्रेते, स्टॉलधारक यांची तपासणी करून अनुचित असल्यास कारवाई करणे, अशी कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी सात पथके कार्यान्वित करण्यात आल्याचे संगत यांनी सांगितले.जिल्ह्यात आतापर्यंत खाद्यतेलाचे २९, वनस्पती तुपाचे ८, बेसन, रवा व मैद्याचे १०, मिठाई व खव्याचे १३ व इतर अन्नपदार्थांचे ९ नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.मिठाईमध्ये रंग १०० पीपीएमपेक्षा जास्त नसावामिठाई विक्रेत्यांनी रोज ताजी मिठाई तयार करावी. रंग वापरताना तो १०० पीपीएमपेक्षा जास्त नसावा, खाद्यरंगाचा वापर करावा, असे आवाहन संगत यांनी केले आहे.दिवाळी व सणासुदीच्या काळात ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना बिल घ्यावे, त्याचबरोबर परवानाधारक व नोंदणीधारक व्यावसायिकांंकडूनच मालाची खरेदी करावी. पॅकबंद अन्नपदार्थांवरील लेबलवर उत्पादकाचा पत्ता, उत्पादनाची तारीख, बॅच नं., अन्नपदार्थ वापरण्याची अंतिम तारीख या बाबींचीही शहानिशा करूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत, असे संगत यांनी सांगितले.तक्रारीकरिता टोल फ्री क्र. १८००२२२३६५ वर संपर्क साधा.खाद्यपदार्थांबाबत किंवा मिठाईबाबत काही शंका असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्र. १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांनी अखेरीस केले आहे.

टॅग्स :foodअन्न