मुंबई : एप्रिल संपत आला तरी धारावीतील एकाही नाल्याच्या सफाईचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या पावसाळ्यात धारावी पाण्याखाली जाण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पालिकेने तत्काळ या परिसरातील नाल्यांची सफाई करावी, अशी मागणीदेखील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.दरवर्षी यातील अनेक भागांत पावसाळ्यात पाणी तुंबते. पालिका वेळेवर ही गटारे आणि नाले साफ करत नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथील रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय तुंबलेल्या गटारांमुळे डासांचे प्रमाणदेखील वाढते आणि साथीचे आजारही नेहमीच बळावत असतात. या वर्षीदेखील पावसाळा सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे. मात्र पालिकेने अद्यापही येथील गटारे आणि नालेसफाईला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे या वर्षी धारावी पाण्याखाली जाणार असल्याची भीती काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
पावसाळ्यात धारावी तुंबण्याची भीती
By admin | Published: April 27, 2016 2:47 AM