शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भय इथले संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2017 1:05 AM

वाहने फिरविण्याच्या स्पर्धा लागल्याचे प्रकार वाघोलीतील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये सर्रास पाहावयाला मिळत आहेत

वाघोली : विद्यार्थिनी व मुलींना आकर्षित करण्यासाठी बुलेटचा फटाका आणि सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून भरधाव वेगाने वाहने फिरविण्याच्या स्पर्धा लागल्याचे प्रकार वाघोलीतील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये सर्रास पाहावयाला मिळत आहेत. विद्यार्थी व तरुणांना पोलिसांची भीतीच उरली नसल्याने धोकादायकरीत्या वाहने चालवली जात आहेत. पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकवगार्तून होत आहे.वाकड येथे एका तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध सर्व स्तरातून होत असतानाच पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. वाघोली परिसरामध्ये मुलींची छेडछाड करण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या तक्रारी पालकवर्गातून येत आहेत. अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धाच लागल्याचे चित्र यामुळे निर्माण झाल्याचे दिसून येते. यासाठी अनेक नामी क्लृप्त्या तरुणांकडून केल्या जातात. वाघोली परिसरात असणाऱ्या ८ मोठ्या महाविद्यालय आणि शाळांच्या परिसरामध्ये महागड्या वस्तूंचे प्रदर्शन करण्याबरोबरच महागड्या गाड्या घेऊन भरधाव वेगात मिरविण्याचे प्रकारदेखील केले जातात. विद्यार्थिनींना आकर्षित करण्यासाठी अनेक मुले बुलेटचा फटाका, सायलेन्सरच्या पुंगळ्या काढणे, स्टंट करणे आदी प्रकार शाळा-महाविद्यालय परिसरामध्ये केले जातात. महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनींच्या घरापर्यंत पाठलाग करणे, दबाव टाकणे, अश्लील कॉमेंट्स करण्याचे प्रकार केले जातात. सदरचा प्रकार विद्यार्थिनींनी घरी अथवा महाविद्यालय प्रशासनाला सांगितल्यास शाळेच्या बाहेरील विषय असल्याचे सांगून तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून हाथ झटकले जातात. मात्र पुन्हा तेच प्रकार विद्यार्थ्यांकडून केले जातात. उपनगरात असलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पुणे व अन्य ठिकाणाहून असंख्य तरुणी शिक्षणासाठी आल्या आहेत़ एकेकाळी सुरक्षित म्हटले जाणारे पुणे शहर आता तेवढे सुरक्षित राहिले नसल्याची भावना या तरुणींच्या मनात आहे़ काही ठिकाणी पोलिसांच्या प्रयत्नांमुळे या तरुणींना सुरक्षित वाटत असले तरी पुढे येऊन तक्रार दिली तर, आपल्यालाच त्रास होईल, या भीतीने तरुणी तक्रार देण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे़ पोलीस प्रशासनाच्या वतीने पाच महिन्यांपूर्वी दामिनी पथक व पोलिसांच्या एका पथकाने शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालून अनेक टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या वेळी अनेक दिवस पोलीस गस्त घालून वाहन ताब्यात घेत होते. त्या वेळी विद्यार्थिनींमध्ये समाधानाचे वातावरण होते, मात्र थोड्या दिवसांची कारवाई पोलिसांनी केल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले आणि तरुण उत्साही कार्यकर्त्यांची वेगाशी स्पर्धा पुन्हा सुरू झाली आहे.सायलेन्सरची पुंगळी त्रासदायकमहाविद्यालय-शाळा परिसरामध्ये अनेक तरुण-विद्यार्थी दुचाकीतून मोठा आवाज काढण्यासाठी सायलेन्सरच्या पुंगळ्या काढतात. भरधाव वेगाने दुचाकी चालविल्यास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या आवाजाच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु यावर तात्पुरती कारवाई करून सोडून दिले जाते. कारवाईच होत नसल्याने आवाजाचा खेळ अजूनही सुरू आहे. सायलेन्सरची पुंगळी सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. याचा सर्वप्रथम बंदोबस्त करावा अशी मागणी प्रामुख्याने होत आहे.>अनेक महाविद्यालांमध्ये मुलींसाठी असणाऱ्या प्रतिसाद अ‍ॅपची जनजागृती करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना त्रास होत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, त्याबाबत आम्ही कारवाई करू.- सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक