शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

दुष्काळाची भीती कायम

By admin | Published: September 22, 2015 2:16 AM

राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. धरणांमधील वाढलेला पाणीसाठा आणि टँकर व चारा छावण्यांची घटलेली संख्या या बाबी दिलासा देणाऱ्या असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तसेच सोलापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी दिले. पिकांचे ३३ टक्के वा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास टंचाई जाहीर करण्याचे धोरण आहे. हे लक्षात घेता आजही हजारो गावे टंचाईच्या टप्प्यात आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत त्याबाबत आढावा घेण्यात येईल. केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.परतीच्या पावसामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या ७० लाख हेक्टरपर्यंत होतील, असा अंदाज आहे. जलयुक्त शिवार योजनेला या पावसाचा फायदा झाला आहे. सध्याच्या पावसाने बहुतांश जिल्ह्यांत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे; तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत सुधारणा झाली असून, या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १४ सप्टेंबर रोजी एकूण १९९० टँकरद्वारे १५१५ गावे आणि ३२२७ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आज ११९० टँकरद्वारे ९०८ गावे आणि १८४२ वाड्यांवर पाणी पुरविले जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)