बीड लोकसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला तर विधानसभानिहाय मतमोजणीला साडेआठ वाजता गोपनीयतेच्या शपथेसह सुरुवात झाली. ही लढत एवढी अटीतटीची झाली की पंकजा मुंडे येणार की बजरंग सोनवणे याची धाकधूक अखेरच्या फेरीपर्यंत कायम होती. पंकजा मुंडे मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहेत.
सुरूवातीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे पाचव्या फेरीला ८९४१ मतांनी आघाडीवर होते. परंतू सहाव्या आणि सातव्या फेरीत भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांचे मताधिक्य कापत बरोबरी गाठण्याकडे वाटचाल केली. सातव्या फेरी अखेर बजरंग सोनवणे हे २०३ मतांनी आघाडीवर होते.
३१ व्या फेरीअखेर सोनावणे ६९८ मतांनी आघाडीवर होते. तर ३२ व्या अखेरच्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. आष्टी मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे.