शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘तिचा’ पंतप्रधानांकडून सत्कार

By admin | Published: March 08, 2017 3:05 AM

सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या जव्हार तालुक्यतील सुशीला खुरकुटे ह्या आदिवासी गरोदर महिलेने आपल्या शौचालया चा खड्डा खणण्यासाठी हातात पहार घेऊन घालून दिलेल्या आदर्शाने

- हितेन नाईक,  पालघर

सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या जव्हार तालुक्यतील सुशीला खुरकुटे ह्या आदिवासी गरोदर महिलेने आपल्या शौचालया चा खड्डा खणण्यासाठी हातात पहार घेऊन घालून दिलेल्या आदर्शाने गरोदर स्त्रीने घ्यावयाच्या काळजी बरोबरीने पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला एक नवा आयाम मिळून दिला आहे. त्यामुळे तिला महिला दिना निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ शक्ती सन्मानाने गांधी नगर येथे सन्मानित करण्यात येणार आहे.जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील सुशीला खुरकुटे ह्या ३० वर्षीय महिलेने आपल्या शौचालयाचे दोन खड्डे एका लोखंडी पहार आणि फावड्याच्या सहाय्याने दोन दिवसात एकटीनेच खणला. तोही ती सहा महिन्यांची गरोदर असताना. जव्हार येथे जिल्हा परिषदेने युनिसेफ सोबत हागणदारी मुक्तीसाठी चालवीलेल्या एका बैठकीत आदेश मुकणे ह्या संवादकाचे विचार तिने ऐकले आणि तिला स्वच्छतेचे महत्व उमगले. आपल्या दोन चिमुकल्यांच्या सुदृढ आरोग्यमय जीवनासाठी आपल्या घरात शौचालय असायलाच हवे हे तिला पटले आणि तिने शौचालय बांधायचे मनाशी ठरवले. गुजरात राज्यातील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे देशातील १० महिलांना ‘स्वच्छ शक्ती सन्मानान’ पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते उद्या सन्मानित करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील विविध भागातून ५३ महिला सरपंचा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खाजगी बस ने रवाना झाल्या आहेत. तर जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल पुंड हे स्वत:रेल्वे ने जाणार असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे ह्यांनी दिवसभर तिची काळजी घेत प्रसूती तज्ञा कडून तिची तपासणी करून घेतली. आणि डहाणू रेल्वे स्टेशन वर तिला घेऊन जात अरावली एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या निधी चौधरी सोबत बसवून दिले. प्रथमच ती ट्रेन ने प्रवास करीत असून आज पहाटे ४.३० वाजता ते गांधीनगर ला सुखरूप पोहोचल्याचे निधी चौधरी ने लोकमत ला सांगितले. युनिसेफने घेतली तिच्या मेहनतीची दखलशासनाच्या १२ हजारात आपले शौचालय पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे निदान मजुरीसाठी जाणारा पैसा आपल्याला वाचवता येईल असा विचार करून दोन दिवस ती भर उन्हात खपत होती. पहारेच्या सहाय्याने तिने खड्डे खणले. तिच्या अजोड अश्या ह्या मेहनतीची दखल प्रथम युनिसेफ चे जयंत देशपांडे ह्यांनी घेत तो फोटो ट्विटर वर टाकला. केंद्रीय स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर ह्यांनी त्यावर ट्विट केला. आणि एका खेड्यातील अशिक्षित मात्र वास्तवतेचे भान असलेल्या एका खेडूत महिलेला ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेची पालघर जिल्ह्याची पहिली ‘ब्रँड अँम्ब्यासिडर’ म्हणून सन्मान मिळवून दिला. आपण स्वच्छतेचे महत्व पटवून द्यायला सुरु वात केल्याचे तिने सांगितले.