शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

सराफ चालवित असलेली भिशी अनियंत्रित ठेवी बंदी वटहुकूमाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 5:57 AM

हप्त्यांवर सोने विकणे कायद्याच्या चौकटीतच

- सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील सराफी दुकानांकडून सोने विक्रीसाठी चालविल्या जाणाऱ्या भिशी या अनियंत्रित ठेवी बंदी वटहुकूमाच्या कक्षेबाहेर आहेत, असल्याचा निर्वाळा इंडियन बुलियन व ज्वेलरी असोसिएशनचे महासचिव सुरेंद्र मेहता यांनी दिला आहे.

भारतात सोन्याला अनन्यसाधारण संपत्तीमूल्य असल्याने प्रत्येकाला ते विकत घेण्याची इच्छा असते. पण हा मौल्यवान धातू एकरकमी खरेदी करता येत नाही. अशावेळी सराफा दुकानदार भिशीद्वारे सुलभ हप्त्यांवर सोने विकतात. यात ग्राहक ११ महिने नियमित हप्ते भरतो व १२ व्या महिन्यात १२ हप्त्यांच्या किमतीचे सोने/दागिने त्याला मिळतात. गेल्या बुधवारी राष्ट्रपती कोविंद यांनी अनियंत्रित ठेवी बंदी वटहुकूम जारी केल्यानंतर या भिशींवरही बंदी आल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत सुरेंद्र मेहता म्हणाले की, आयकर कायद्याने सराफ जे हप्ते ग्राहकांकडून घेतात ते ठेव म्हणून नव्हे तर अ‍ॅडव्हान्स फॉर सेल म्हणून स्वीकारतात. कायद्याने या अनामत रकमेचा व्यवहार ३६५ दिवसात पूर्ण करावा लागतो.

या भिशीची विक्री १२ व्या महिन्यात पूर्ण होत असल्याने ती कायद्याच्या चौकटीतच आहे. या रकमेवर व्याज देता येत नाही मग १२ व्या हप्त्याचे काय यावर मेहता म्हणाले कीे, त्याची तरतूद सराफ १० टक्के डिस्काऊंट वा घडणावळ माफ करून करतात. यामुळेही या भिशीला हा वटहुकूम लागू होत नाही. देशात जवळपास चार लाख सराफी दुकाने असून त्यापैकी ५० ते ६० टक्के दुकानदारांचा व्यवसायच भिशीवर अवलंबून असतो.भिशी म्हणजे बॅचलर्स कॉन्ट्रीब्युशनभिशीचा खरा अर्थ बॅचलर्स कॉन्ट्रीब्युशन (बीसी) असा आहे. पूर्वी सैन्यातील जवान अशा पद्धतीने बचत करून वर्षातून एकदा सणासुदीला मोठी रक्कम घरी पाठवत असत. त्याच बीसीचा अपभ्रंश होऊन पुढे भिशी हा शब्द प्रचलित झाला आहे.