शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

माळरानावर फुलली शेती, वर्षभराचा मिटला पाणीप्रश्न

By admin | Published: October 14, 2016 8:43 AM

गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि.१४ -  गेल्या वर्षाची गोष्ट, पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेलेला, नदी कोरडी ठाक पडलेली तर विहिरींनीही तळ गाठलेला. थंडीच्या सुरुवातीलाच दीड हजार लोकसंख्येच्या सटाने गावाला पाणीटंचाईने वेढलेले. अस्मानी संकटापुढे संपूर्ण गावापुढेच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलेला. अशावेळी पाण्यासाठी शासन दरबारी टॅँकरसाठी प्रयत्न सुरू झाले, एकदाचा टॅँकर मंजूर झाला, पण त्याचे पाणी किती व कोणाला पुरणार? मग आठवण झाली १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेच्या हाताला काम देण्याबरोबरच, पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाची. गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला. तलावातील गाळाने माळरान तर फुलविलेच, पण सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ग्रामस्थांची तहान कायमची भागवली. राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याने नांदगाव तालुक्यातील सटाने ग्रामस्थांना जागे केले. अनकाई डोंगरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या व एक हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या सटाने या गावाला उन्हाळ्यातील पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली, त्यातच १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर येथील शेती पूर्णत: फक्त पावसावरच अवलंबलेली अशा परिस्थितीत फक्त खरीप हंगामावर भीस्त ठेवून असलेल्या सटाने ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यास महसूल खाते यशस्वी झाले. अनकाई डोंगर रांगाच्या उतरावरून येणारे, परंतु आडकाठी नसल्याने वाहून जाणारे पाणी शिवारातच अडविण्यासाठी गाळाने भरलेल्या पाझर तलावाचे काम हाती घेण्यात आले. दोन कोटी ३५ लाख रुपये किमतीचे ग्रामस्थांनी केलेले श्रमदान व महसूल खात्याने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या जोडमुळे बघता बघता पाझर तलावातील एक लाख ३५ हजार ब्रास म्हणजेच तीन लाख २६ हजार ७०० घनमीटर क्षेत्रावरील गाळ उपसण्यात आला व दुर्लक्षित झालेल्या पाझर तलावाला जलयुक्त शिवार अभियानाने पुनर्वैभव प्राप्त करून दिले. गावाच्या एकजुटीने शिवाराचे सारे रूपडेच आता बदलले. पाझर तलावातून उपसलेला गाळ माळरानावरील शेतकऱ्यांनी उचलून नेला होता, त्याची जागा आता शेती फुलविण्यात झाली आहे. निसर्गाची साथ व जमिनीच्या पोतीत कमालीचा बदल झाल्याने जवळपास साडेतीनशे एकरवर झेंडूच्या बागा, बाजरी व मक्याचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांचे चेहरेही फुलले आहेत. अनकाई डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याला अनकाई व सटाने दरम्यान सात लहान बंधाऱ्यांची आडकाठी असली तरी यंदा पहिल्यांदाच हे बंधारेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत, ते भरल्याशिवाय सटाने येथील मोठ्या तलावात पाणी पोहोचत नाही. परतीच्या पावसाने चांगलीच साथ दिल्याने सटानेचा तलाव नुसता भरलाच नाही, तर ओव्हरफ्लो होऊन तुडुंब वाहिल्याने त्याचे पाणी पुढे जाऊन नागासाक्या धरणाला जाऊन मिळाले आहे. म्हणजेच सटाने गावाचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबर नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनांनाही हातभार लागला आहे. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा...शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सटाने गावातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेताना महसूल विभागाची काहीशी दमछाक झाली. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने १९७२ मध्ये हा तलाव उभारताना त्यासाठी जागा संपादित केली व त्याचा रितसर मोबदलाही संबंधितांना अदा केला होता. कालांतराने या तलावातील पाण्याची जागा गाळाने घेतली व तलावाच्या जागेवरच पुन्हा मूळमालकांनी शेती करायला सुरूवात केली. ज्यावेळी गाळ काढायचा विषय चर्चिला गेला तेव्हा त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. तलावाचा गाळ काढल्यास आम्ही शेती कुठे करायची असा प्रश्न विचारला जाऊ लागल्यावर नांदगावच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन, मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांनी समस्त गावकऱ्यांना एकत्र करून अगोदर तलावाचे महत्त्व विषद करून देतानाच, त्यात साठणाऱ्या पाण्याचे फायदे सांगितले. आज जेव्हा सटाने शिवारातील माळरान फुलले तेव्हा ग्रामस्थांना जलयुक्तचे महत्त्व पटले व त्याचबरोबर सरकारी यंत्रणेच्या आभारासाठी हातही जोडले गेले.