शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

शाळेच्या शौचालयात सापडला गर्भ

By admin | Published: December 28, 2016 1:25 AM

शाळा व कॉलेज इमारतीच्या शौचालयात गर्भपात झाल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता

नवी मुंबई : शाळा व कॉलेज इमारतीच्या शौचालयात गर्भपात झाल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता पोलिसांनी याठिकाणी सापडलेले मृत गर्भाचे अवशेष चाचणीसाठी पाठवले आहेत. विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या एमजीएम शाळा व महाविद्यालयाच्या इमारतीमध्येच हा प्रकार घडला आहे.शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच नेरूळचे एमजीएम शाळा व कॉलेज पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. याठिकाणी शाळा व कॉलेज एकाच इमारतीमध्ये चालवले जात आहे. तिसऱ्या मजल्यावरील महिला शौचालयात शनिवारी सकाळी गर्भपात झाल्याचे आढळले. महिला सफाई कामगार त्याठिकाणी काम करत असताना शौचालयाच्या भांड्यालगत रक्ताचे डाग दिसले. यामुळे त्यांनी निरखून पाहिले असता, शौचालयाच्या भांड्यामागे एक-दीड महिन्याचा गर्भाचा गोळा आढळून आला. महिला कामगाराने याची माहिती शाळा व्यवस्थापनाला दिली. मृत गर्भाचे हे अवशेष चाचणीसाठी पाठवल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ज्या शौचालयात हा मृत गर्भ सापडले, ते शौचालय शाळा व कॉलेजच्या विद्यार्थिनींसह महिला शिक्षिकांच्या वापरासाठी आहे. यामुळे त्याठिकाणी ये-जा झालेल्या महिला व विद्यार्थिनींच्या चौकशीचे मोठे आव्हान नेरूळ पोलिसांपुढे आहे. याच शाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने वर्गातच बलात्कार केल्याची उघड झाले आहे. गुन्हे शाखेमार्फत अटकेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन व संबंधित शिक्षकाची चौकशी सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे हे शाळा व्यवस्थापन पुन्हा एकदा वादात सापडले आहे. (प्रतिनिधी)