सोलापूर : मध्यंतरीच्या काळात भारत पाकिस्तानची परिस्थिती तणावपूर्ण बनली होती़ दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावेळी भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख उत्तर दिले़ त्यानंतर आम्हाला हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोकं सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते. मात्र स्वत: इम्रान खान यांनी देखील स्वीकार केलं आहे की सर्जिकल स्ट्राईक झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनो, मैदानात या आम्ही दोन हात करायला तयार आहोत असं सांगताना देशाच्या सुरक्षेची तडजोड केली जाणार नाही नसल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी अमित शहा सोलापुरात आले होते़ इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत अमित शहा बोलत होते़ पुढे शहा म्हणाले की, महाराष्ट्रात आता निवडणूक होणार आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पाच वर्ष पूर्ण केली आहेत. प्रत्येक क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण काम केलं आहे. १५ वषार्चा झालेला खड्डा मोठा आहे, तो भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र यांना साथ द्या, असेही शह म्हणाले.