महाड : काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य इब्राहिम झमाने यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधारासह एकूण पाच संशयितांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक इर्टिका कारही देखील हस्तगत केली आहे.शुक्र वारी सकाळी महाड तालुक्यातील अप्पर तुडील येथे सकाळी साडेसहा वाजता इब्राहिम झमाने हे नमाज पढून घरी परतत असताना इर्टिका कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपर आणि लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला करून पलायन केले होते. या हल्ल्यात इब्राहिम झमाने गंभीररीत्या जखमी झाले होते. महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी झमाने यांचा भाचा जमिर फैरोजखान देशमुख (रा. अप्पर तुडील) याला ताब्यात घेतले. तर रोहा तालुक्यातील शिरवणे येथून किरण सुतार व दीपक सुतार या दोघांना तर नवी मुंबई नेरूळ येथून देवेंद्र ऊर्फदेवा रमेश म्हात्रे, संदेश शिरखोंडे (दोघेही रा. दारावे नेरु ळ) अशा पाच संशयित आरोपींना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आहे. झमाने यांच्यावरील हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे.
झमाने हल्ला प्रकरण; मुख्य सूत्रधारासह पाच संशयित ताब्यात, एक कारही केली हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 3:37 AM