शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भूसंपादनाअभावी पंधरा वर्षांपासून पूल अधांतरी

By admin | Published: June 07, 2017 3:39 AM

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील वाहून गेलेला पूल केवळ सहा महिन्यांत पुन्हा बांधून त्याचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : गतवर्षी गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील वाहून गेलेला पूल केवळ सहा महिन्यांत पुन्हा बांधून त्याचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावरून सरकारच्या गतिमान कार्यप्रणालीची प्रचिती उभ्या महाराष्ट्रास येत आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील माणकुळे खाडीवर १५ वर्षांपूर्वी तब्बल १२ कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात सुरुवात करण्यात आली. मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने खारेपाटातील मांडवा, रेवस, हाशिवरे, माणकुळे,धेरंड, शहापूर, पेझारी ते नागोठण्यापर्यंतच्या जनतेची सुकर दळणवळणाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. मांडवा-रेवस-हाशिवरे, माणकुळे, धेरंड, शहापूर, पेझारी नाका आणि पुढे पोयनाड-वडखळ नाका मार्गे मुंबई-पुणे आणि पेझारीनाका-नागोठणे-रोहा व पुढे गोवा राष्ट्रीय महामार्ग अशी वाहतूक करण्याच्या उद्देशाने माणकुळे खाडीवरील हा पूल बांधण्यात आला. दिघी पोर्ट, जेएनपीटी, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी प्रकल्पांमुळे भविष्यात परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परंतु माणकुळे खाडीवर बांधलेल्या पुलास दोन्ही बाजूस जोडरस्तेच करण्यात आले नसल्याने वाहतुकीवरील ताण मात्र कमी होवू शकलेला नाही. सद्यस्थितीत मांडवा-रेवस-हाशिवरे, माणकुळे येथील वाहतूक कार्लेखिंड नाका मार्गे होत असल्याने वडखळ-अलिबाग या रस्त्यांवरील वर्दळ वाढल्याने अपघातांचे प्रमाणातही वाढले आहे. माणकुळे पुलाच्या उभारणीसाठी १५ वर्षांपूर्वी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र पुलाच्या जोडरस्त्यांसाठी आवश्यक १० एकर भूमी संपादन करण्यास रायगड जिल्हा प्रशासनाला गेल्या १५ वर्षांत वेळच मिळालेला नाही. त्यामुळे हा पूल अधांतरीच रखडला आहे. याच शहापूर-धेरंड परिसरात खासगी क्षेत्रातून उभारण्याचा मनोदय असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या खासगी वीज प्रकल्पाकरिता याच रायगड जिल्हा प्रशासनाने केवळ दोन वर्षांत तब्बल १००० एकरचे भूमी संपादन करून आश्चर्यकारक अशी कार्यक्षमता दाखविली असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी रायगड जिल्हा प्रशासनास अनेक लेखी निवेदने देवून लक्षात आणून दिले आहे. मात्र त्यावरही जिल्हा प्रशासनास कार्यवाही करण्यात रस नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय निष्क्रियतेमुळे वाहतुकीचे नियोजनच चुकले१० एकर भूसंपादनाकरिता १५ वर्षांत वेळ नाहीखासगीरीत्या उभारण्यात येणाऱ्या टाटा वीज प्रकल्पासाठी केवळ दोन वर्षात केले तब्बल १००० एकर भूमी संपादन सद्यस्थितीत मांडवा-रेवस-हाशिवरे, माणकुळे येथील वाहतूक कार्लेखिंड नाका मार्गे होत आहे.वडखळ-अलिबाग या रस्त्यांवरील वर्दळ वाढल्याने अपघातांचे प्रमाणातही वाढले आहे.>कोकण विभागीय आयुक्तही अचंबितटाटा पॉवर कंपनीकरिता शासनाने रायगड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्या संदर्भात श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा-सात वर्षांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता गेल्या सहा वर्षांत करण्यात आली नाही. अखेर कोकण महसूल आयुक्त कार्यालयासमोर गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या बैठकीत या १५ वर्षे अधांतरी असलेल्या पुलाचा मुद्दा श्रमिक मुक्ती दलाचे समन्वयक एन.जी.पाटील यांनी आयुक्त देशमुख यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर ते अचंबित झाले, परंतु गेल्या १५ वर्षांपासूनची ही शासकीय चूक सुधारण्याचे कोणतेही आदेश त्यांनी दिले नाहीत.