शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

यवतमाळ येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 7:00 AM

साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत.

ठळक मुद्दे२८ आॅक्टोबरच्या बैठकीत सन्मानाने संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब साहित्य संस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश

पुणे : घटनादुरुस्तीत नमूद केल्याप्रमाणे साहित्य महामंडळाकडे सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून नावे प्राप्त झाली असून, २८ आॅक्टोबर रोजी होणार असलेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. साहित्य संस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या नऊ दशकांच्या इतिहासात अध्यक्षपदी महिला साहित्यिका विराजमान होणार का, याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला जाणार नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने एका नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०१८ सालच्या यवतमाळ येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर ही नावे पाठवण्यात आली आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाकडून डॉ. बाळ फोंडके, प्रेमानंद गज्वी आणि रामदास भटकळ, विदर्भ साहित्य संघाकडून डॉ. प्रभा गणोरकर आणि किशोर सानप, छत्तीसगडकडून प्रेमानंद गज्वी, गोमंतककडून सोमनाथ कोमरपंत, मध्य प्रदेशकडून भारत सासणे, बडोदे आणि तेलंगणातून डॉ. अरुणा ढेरे आणि कर्नाटकातून डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे महामंडळाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी डॉ. प्रेमानंद गज्वी यांचे नाव पाठवले आहे. या नावांबाबत चर्चा होऊन बहुमताचे एका नावाची निवड २८ आॅक्टोबरच्या बैठकीत सन्मानाने केली जाणार आहे........................मराठवाडा साहित्य परिषदेकडून नरेंद्र चपळगावकर, ना.धों.महानोर आणि प्रेमानंद गज्वी यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र नरेंद्र चपळगावकर आणि ना.धों.महानोर यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने परिषदेला नावे मागे घ्यावी लागली. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या नावांचा बैठकीत विचार केला जाणार नाही. -------------२०१० साली ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे झाले होते. उत्तम कांबळे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. त्यावेळी प्रभा गणोरकर निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. डॉ. अरुणा ढेरे यांनी आजवर निवडणूक लढवलेली नाही.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीliteratureसाहित्यAruna Dhereअरुणा ढेरेMaharashtraमहाराष्ट्र