शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

पाचशेच्या मुद्रांक शुल्कासाठी पावणेचार लाखांचा दंड

By admin | Published: July 23, 2016 1:46 AM

मुद्रांक शुल्क व नोंदणी फी ३ लाख ७३ हजार ४०० रुपये १५ दिवसांत भरण्यात यावी, अशी नोटीस देण्यात आल्याने या शेतकऱ्यास धक्काच बसला

जय जवान - जय किसान : रॅलीत २० जवानांचा सहभाग

चंद्रपूर : भारतीय लष्कराच्या २० गार्ड बटालियनची सायकल रॅली भुसावळवरून औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, तुळजापूर, लातुर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती होत परत भुसावळला जात आहे. ही रॅली चंद्रपूर तालुक्यातील नकोडा येथे दाखल झाली. या रॅलीचे नेतृत्व कॅप्टन अंकीत शर्मा हे करीत असून त्यांच्यासोबत २० गार्ड बटालियनचे जवान सहभागी आहेत. या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश महाराष्ट्रभर ‘जय जवान, जय किसान’ हा उद्घोष करीत शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत करण्याचा आहे. तसेच हे सर्व जवान २० गार्ड बटालियनचे असल्यामुळे त्या सैनिकांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेट देणे आणि मानचिन्ह व टोपी देऊन त्यांचा सन्मान करणे हा आहे. नकोडातील एकूण १२ जवान भारतीय लष्करात आपली सेवा बजावित आहे. समीर रूषी मांदाडे, नितीन रूषी मांदाडे, शंकर संभाशिव देवतळे, नागोराव उरकुडे, राकेश कोवे, योगेश बाळा निखाडे, प्रवीण रामदास गावंडे, नरेश दिलीप बांदूरकर, महेश गिरडे, राकेश मुक्के, नागेंदर चव्हाण, गणेश नरड आणि संभाशिव देवतळे व सिध्दार्थ पाटील हे माजी सैनिक आहे. समीर रूषी मांदाडे हे २० गार्ड बटालियनमध्ये सेवारत असल्यामुळे भारतीय लष्कराच्या सायकल रॅलीने नकोडा येथे भेट दिली. त्यांनी समीर मांदाडे यांच्या कुटुंबियांंची भेट घेतली. त्यांना मानचिन्ह व टोपी देऊन सन्मान केला. नकोडा येथे रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. नकोडा येथील शालेय विद्यार्थ्यांनीसुद्धा रॅलीचे स्वागत केले. सरपंच तनुश्री बांदूरकर आणि जि.प. सदस्य ब्रीजभूषण पाझारे यांनी कॅप्टन अंकीत शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सायकल रॅली गावभर फिरविण्यात आली. हनुमान मंदिर येथे रॅलीला सरपंच तनुश्री बांदूरकर, जि.प. सदस्य ब्रीजभूषण पाझारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले. यावेळी माजी सरपंच रूषी कोवे, माजी उपसरपंच किरण बांदूरकर, ग्रामपंचायत सदस्य अंजय्या गोनपल्लीवार, नरेश एटकापेल्ली, ममता उरकुडे, संगिता पेरकावार, रंजना झाडे, कांचन वाकडे, ग्रामविकास अधिकारी ए.के. जेंगठे, पोलीस पाटील, सुमन ठमके, माजी सदस्य विकास पाटील, मोहम्मद हनिफ, माजी सैनिक संभाशिव देवतळे, प्रतिष्ठित नागरिक आर्वे गुरुजी, महादेव वाघमारे, ठाकरे, शंकय्या, डांगे, संगिता मानकर, शिला परागे, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद मेंढे, आशिष उरकुडे, आरोग्यसेवक काटप्पाजी, मंगेश राजगडकर, अतुल झाडे, संदीप बुरडकर, दिलीप कोवे, दिलीप भीवनकर, दिलीप बांदूरकर, बाळा निखाडे, जईंद्र मंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)