शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयासाठी लढा

By admin | Published: June 26, 2014 12:46 AM

राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अडचणीत सापडले आहे. विलंबाने अर्ज केल्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने महाविद्यालयाचे निरीक्षणच केले नाही.

हायकोर्टात याचिका : ‘एमसीआय’ला मागितले स्पष्टीकरणनागपूर : राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अडचणीत सापडले आहे. विलंबाने अर्ज केल्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने महाविद्यालयाचे निरीक्षणच केले नाही. निरीक्षणाशिवाय महाविद्यालयाला मान्यता मिळणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी प्रकरण ऐकल्यानंतर शासन व कौन्सिलला भूमिका स्पष्ट करण्यास सांगून, २७ जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.केंद्र शासनाने गेल्या ७ फेब्रुवारी रोजी देशभरातील आठ शहरांत नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात गोंदियाचा समावेश आहे. यासाठी केंद्र शासनाने १८९ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी २०० खाटांचे रुग्णालय व १० हेक्टर जमीन आवश्यक होती. शासनाने गोंदिया महाविद्यालयासाठी निर्धारित वेळेत अर्ज केला नाही. यामुळे कौन्सिलने अर्ज फेटाळला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाला पत्र लिहिले. त्यावरही काहीच झाले नाही. २०११-१२ मध्ये केंद्र शासनाने सात शहरांत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात विदर्भातून चंद्रपूरचा समावेश होता, परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही. यावेळी गोंदियातील महाविद्यालय संकटात सापडले आहे. शासनाने गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अधिष्ठात्यांची नियुक्तीही झाली आहे. आता केवळ कौन्सिलने निरीक्षण करून महाविद्यालयाला मान्यता देण्याची प्रतीक्षा आहे. यासाठी कौन्सिलला आवश्यक निर्देश देण्याची याचिकाकर्त्याची विनंती आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा यांनी बाजू मांडली.यवतमाळ, अकोला महाविद्यालयांवर २ जुलैला सुनावणी निरीक्षणात विविध उणिवा आढळून आल्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १५० जागांतून ५० जागा कमी करण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांना केली आहे. न्यायालयाने अंतरिम आदेशात कौन्सिलच्या शिफारशीवर पूर्व परवानगीशिवाय कोणताही पुढील निर्णय घेण्यास केंद्र शासनाला मनाई केली आहे. गेल्या तारखेला दोन्ही महाविद्यालयांतील उणिवा कशा दूर कराल व त्यासाठी किती वेळ लागेल यासंदर्भात २५ जूनपर्यंत सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले होते. त्यानुसार प्रधान सचिवांनी अकोला महाविद्यालयासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले. यवतमाळ महाविद्यालयासंदर्भात उत्तर देण्यासाठी सरकारी वकील भारती डांगरे यांनी एक आठवड्याचा वेळ मागून घेतला आहे. याप्रकरणावर आता २ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. याचदरम्यान, कौन्सिललाही देशातील किती वैद्यकीय महाविद्यालयांतील उणीवा शोधून काढल्या, यापैकी किती खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत उणिवा आहेत व उणिवांचे स्वरूप कायम आहे यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)