लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होताना कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. रुग्णालयांतील बेडची उपलब्धता कळावी यासाठी डॅशबोर्डही आहेत. मात्र, त्यानंतरही आयसीयू बेड मिळविण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल संपलेले नाहीत. ७८ टक्के लोकांनी त्याबाबतची हतबलता व्यक्त केली असून, फक्त चार टक्के रुग्णांनाच विनासायास आयसीयू बेड उपलब्ध होत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या ११ दिवसांत तब्बल १० लाख नव्या रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्येने ५६ लाखांचा आकडा पार केला आहे. रुग्णालयांवरील ताण वाढत आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आॅनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या लोकल सर्कल या संस्थेने दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात सर्वेक्षण केले. त्यातून आयसीयू बेड मिळविण्यासाठी कराव्या लागणाºया धडपडीचे धक्कादायक वास्तव समोर आले.रिअल टाइममाहिती हवीरुग्णालयांतील आयसीयू बेडच्या उपलब्धतेबाबतची माहिती मिळावी यासाठी विविध प्रयत्न केले जात असले तरी त्यातून खरी माहिती उपलब्ध होत नाही. बेड उपलब्ध असल्याचे सरकारी यंत्रणा सांगत असल्या तरी प्रत्यक्षात रुग्णालयांतून बेड नसल्याचे उत्तर दिले जाते. त्यामुळे रुग्णालयांच्या वेबसाईट आणि त्यांच्या प्रवेशद्वारावर बेडच्या उपलब्धतेची रिअल टाइम माहिती मिळायला हवी, असे मत ९२ टक्के लोकांनी या सर्वेक्षणात नोंदविले. तर, सात टक्के लोकांना तशी गरज वाटत नसून एक टक्के लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले.सर्वेक्षणाला २११ जिल्ह्यांतील १७ हजार लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातून आयसीयू बेड मिळविण्यासाठी कराव्या लागणाºया धडपडीचे धक्कादायक वास्तवसमोर आले.सर्वेक्षणात नोंदविण्यात आलेली मते38%लोकांनी आयसीयू बेड मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ, ओळखीचा वापर करावा लागतो असे मत नोंदविले.7%लोकांनी हे बेड मिळविणे प्रचंड त्रासदायक होत असल्याचे मत सर्वेक्षणात नोंदवले.4%लोकांनी आयसीयू बेड मिळविण्यासाठी सोशल मीडियावर गाºहाणे मांडावे लागत असल्याचे मत व्यक्त केले आहे.40%लोकांनी उपरोक्त तिन्ही पर्यायांचा वापर करावा लागत असल्याचे नमूद केले.