ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, ९ - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून दिल्याने सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देवस्थानच्या या निर्णयाचे सर्व स्तरांवर स्वागत होत असून शुक्रवारी संध्याकाळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी चौथऱ्यावर जाऊन शनीच्या शिळेचे दर्शन घेतले. मात्र शनि चौथ-यावर प्रवेश मिळणे ही फक्त सुरूवात असल्याचे त्यांनी नमूद केले. आमचा लढा कायम सुरू राहणार असून १३ एप्रिलपासून महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात प्रवेश मिळावा याकरता लढा देणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले.
' आम्ही तीन महिन्यांपूर्वी संघर्ष सुरू केला आणि महिला शक्तीचा विजय झाला, ही तर केवळ सुरुवात आहे. महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा म्हणून १३ एप्रिलपासून आंदोलन करणार आहोत' असे त्या म्हणाल्या
गेल्याच आठवड्यात महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करणा-या महिला कार्यकर्त्यांना महिला पुजा-यांनीच रोखून धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी हा निर्णय घेतला असून ज्या ज्या मंदिरात महिलांना केवळ महिला आहेत म्हणून प्रवेश नाकारला जाईल, तेथे आमचा लढा सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
Its been 3 months amd after that the women power has won, this is just the beginning: Trupti Desai, Bhumata Brigade pic.twitter.com/07S2wijbCW— ANI (@ANI_news) April 9, 2016
Fight to continue wherever theres gender bias on entering temples, 13th April will fight for entry into Mahalakshmi Temple, Kolhapur: TDesai— ANI (@ANI_news) April 9, 2016