'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 05:58 PM2024-09-29T17:58:45+5:302024-09-29T17:59:37+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीएम शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे.

File a case against Chief Minister Eknath Shinde immediately Petition filed in Bombay High Court | 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Eknath Shinde ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीएम शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नख्वी यांच्यामार्फत ही केली याचिका दाखल केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे मुस्लिमद्वेषी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या सुनावणी होण्याची शक्यता आहे. भडकाऊ भाषण करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याची सक्त ताकीद मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी पोलिसांना दिली आहे. मुस्लिम द्वेषी मेसेज जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत, असंही यात म्हटले आहे. 

“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

मुस्लिमविरोधी भाषणे सोशल मीडियावरुन काढून टाकावी मुस्लिमांना टार्गेट करणारे मोर्चे, आंदोलने यांचे लाइव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत. मुस्लिमविरोधी भाषणे, मेसेज पसरवले जाणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली जावीत,अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यासह मुस्लिमविरोधी रॅली आणि मोर्चांची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर निश्चिक करावी. भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई, असंही या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, आता या याचिकेवर काही दिवसातच सुनावणी होऊ शकते.

Web Title: File a case against Chief Minister Eknath Shinde immediately Petition filed in Bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.