मुंबई : साखरे येथे आदिवासी आश्रमशाळेतील कौसल्या भरसदचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.विखे पाटील म्हणाले, याच आश्रमशाळेतील कमल सूरज चौधरी ही ११ वर्षीय मुलगीही अत्यंत गंभीर आहे. या दोघींनाही चार दिवसांपासून ताप होता. पण विक्रमगड रुग्णालयात त्यांना उपचार मिळाले नाहीत. या रुग्णालयातील ४पैकी ३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत; तसेच या आश्रमशाळेतील अधीक्षिकेचे पदही रिक्त आहे. तेथील एका सफाई कामगाराकडे सध्या या पदाचा कार्यभार असल्याचे विखे-पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.आदिवासी विभागावर ना मंत्र्याचे नियंत्रण आहे ना प्रशासनाचे. या विभागाच्या मंत्र्याला त्यांच्याच तालुक्यात प्रवेशबंदी घातली जाते, आदिवासी मोर्चा काढतात आणि सर्वोच्च न्यायालय कुपोषण आणि बालमृत्यूवरून सरकारची खरडपट्टी काढते, तरी या विभागाला जाग कशी येत नाही,असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे. (विश्ोष प्रतिनिधी)
मंत्री सवरांवर गुन्हा दाखल करा - विखे पाटील
By admin | Published: October 08, 2016 4:19 AM