अमरावती : मैत्रेय उद्योग समूहाचा संचालक जनार्दन अरविंद परुळेकर याच्याविरुद्ध अमरावती पोलिसांनी गुरुवारी ११४१ पानांचे आरोपपत्र दाखल केले. दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ‘मैत्रेय’ने हजारो अमरावतीकरांची सुमारे ३० कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे.धीरज जनार्दन वंजारी यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी ११ मार्च रोजी मैत्रेय उद्योग समूहाचा संचालक जनार्दनपरूळेकर, संचालिका वर्षा सत्पाळकर, प्रमोद डाखोरे, हर्षद पाटील, लक्ष्मीकांत नार्वेकर, विजयशंकर कावरे, नितीन चौधरी या सात जणांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२० ब, सहकलम ३, महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षण करणारा अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले.गेल्या सहा महिन्यांमध्ये २० हजारांहून अधिक गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली व फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या. त्याआधारे पोलिसांनी परुळेकरला अटक करून त्याच्याविरुद्ध गुरुवारी येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.जनार्दन परुळेकर हा सध्या परभणी कारागृहात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश अणे यांनी दिली. (प्रतिनिधी)
परुळेकरविरूद्ध आरोपपत्र दाखल
By admin | Published: November 04, 2016 5:02 AM