शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

गीता शेजवाल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा

By admin | Published: June 06, 2016 5:05 PM

सोलापूर, बारामती, पिंपरीचिंचवड, पुणे जिल्ह्यातील वाहनांची नियम धाब्यावर बसवून उस्मानाबाद येथे नोंदणी केल्याप्रकरणात निलंबित असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ६ -  सोलापूर, बारामती, पिंपरीचिंचवड, पुणे जिल्ह्यातील वाहनांची नियम धाब्यावर बसवून उस्मानाबाद येथे नोंदणी केल्याप्रकरणात निलंबित असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी सोलापूर व उस्मानाबाद आरटीओला दिले आहेत. 
इतर ठिकाणी नियुक्ती असताना कार्यालयात थांबून वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देऊन शासकीय महसूल बुडविल्याप्रकरणी उस्मानाबाद आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल यांना गृहविभागाचे अव्वर सचिव एम. आर. शेळके यांनी फेब्रुवारीमध्ये निलंबित केले आहे. त्यांना सुरूवातीला नागपूर कार्यालयाशी त्यांना संलग्न केले होते त्यानंतर आता अंबेजोगाई कार्यालय देण्यात आले आहे. 
मोटार वाहन निरीक्षक शेजवाल यांची सोलापुरातून उस्मानाबादला बदली झाली. एप्रिल व मे २0१५ या दोन महिन्याच्या काळात त्यांनी वायुवेग पथकात कार्यरत असताना १0४८ वाहनांची तपासणी करून  फिटनेस प्रमाणपत्र दिले. यात ८३0 वाहनांचे नूतनीकरण व एसटीच्या गाड्यांना म्यॅनुअल प्रमाणपत्र दिल्याची संगणकावर नोंद आहे. हे करताना त्यांनी तडजोड शुल्क आकारण्याकडे दुर्लक्ष केले. ९0 वाहनांची योग्यता प्रमाणपत्रे उशिरा सादर करून ४ लाख ८६ हजार ५00 रुपयांचा कर बुडविला. ८३0 फिटनेस प्रमाणपत्र दिलेल्यापैकी ४८५ बसची पाहणीच केली नसल्याचे आढळले आहे. यात उस्मानाबाद कार्यालयात दोन महिन्यात २२ लाखाचा महसूल बुडाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. शेजवाल यांनी बार्शी येथील ११ स्कुलबस उस्मानाबादला पासिंग केल्याचे दिसून आले. याप्रकरणाची सोलापूर कार्यालयाने पूर्ण चौकशी केल्यावर अशाप्रकारे त्यांनी ११७ वाहनांचे बेकायदा पासिंग करून १२ लाखाचे नुकसान केल्याचे आढळले आहे. या दोन्ही प्रकरणात शेजवाल यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.
 
जनहित याचिकेचा आधार
याप्रकरणात माधव कर्वे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेचा आधार घेण्यात आला आहे. याबाबत उच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी २0१६ रोजी अंतिरम आदेश दिले आहेत. त्यात आरटीओ कार्यालयातील जे अधिकारी बेकायदेशीर कामे करतील त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात संबंधित अधिकाºयांच्या कोणत्या कृत्याची दखल घ्यायची हेही स्पष्ट केले आहे. मेकॅनिक फिट नसलेल्या वाहनांचे पासिंग करणे, कार्यक्षेत्राबाहेरील वाहनांचे पासिंग, कर न भरलेली वाहने, एकाच वेळी मोठ्या संख्येने परवान्याचे वितरण किंवा वाहने पासिंग करणे, कार्यालयात न आलेल्या वाहनांची पाहणी न करता योग्यता प्रमाणपत्र देणे. शेजवाल यांनी अशा पद्धतीचे कृत्य केल्याने त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करावी असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. 
 
गुन्हा दाखल करण्यास विलंब
अशाच पद्धतीचे प्रकरण औरंगाबादेत उघड झाले आहे. याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक एस. एस. संके यांच्याविरूद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संके यांनी १ डिसेंबर २0१५ ते २ जानेवारी २0१६ या कालावधीत ६९९ वाहनांना नियमबाह्य पद्धतीने योग्यता प्रमाणापत्र दिल्याचे उघड झाल्याने ही कारवाई झाली. पण शेजवाल यांच्याबाबतीत गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. शेजवाल यांनी ज्या ठिकाणी काम केले आहे, म्हणजेच नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी—चिंचवड, बारामती, सोलापूर, उस्मानाबाद येथील वाहने नियमबाह्य पासिंग केल्याचे दिसून आले आहे. 
 
लाचलुचपतचे कलम लावावे
मोटार वाहन निरीक्षक शेजवाल यांची कृती रस्ता सुरक्षिततेच्यादृष्टीने धोकादायक असल्याने भादंवि दंड विधान संहिता १८६0 च्या कलम ४२0, ४६५,४६८,१२0 ब, १0९,२0१, ३४, मोटार वाहना कायदा कलम १८९ अन्यवे गुन्हा दाखल करण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी शासनाचे नुकसान करून वाहनधारकांचा फायदा करून दिल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे त्या लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १९८८ च्या ७,८,९ नुसार कारवाईस पात्र आहेत. त्यातून त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन सीआयडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.