शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

अवमान याचिका दाखल करणार

By admin | Published: October 13, 2015 12:48 AM

शिक्षण हक्क कायद्यानुसार, पुणे विभागातील प्रवेश नाकारणाऱ्या १४ शाळांविरूद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबाबतची कार्यवाही शिक्षण मंडळाने सुरू केली आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार, पुणे विभागातील प्रवेश नाकारणाऱ्या १४ शाळांविरूद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबाबतची कार्यवाही शिक्षण मंडळाने सुरू केली आहे. प्रवेश नाकारलेल्याशाळांतील विद्यार्थ्यांना त्यांना २५ टक्के प्रवेश पात्र असणाऱ्या इतर खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेशाची पूर्तता १४ व १५ तारखेला सहकारनगर येथील महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग शाळेत केले जाणार आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षित जागेवर प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शाळांना बंधनकारक आहे. तरीही काही शाळांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत. त्या १४ शाळांविरूद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. मात्र प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरालगतच्या २५ टक्के प्रवेश पात्र खाजगी विना अनुदानित शाळेत प्रवेश दिले जातील. शाळेतील शिल्लक जागा आणि विद्यार्थी संख्यांचे गुणोत्तर पाहून हे प्रवेश दिले जाणार आहेत यासाठी १४ व १५ आॅक्टोबर रोजी महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहे. काही शाळांना १४ आॅक्टोबर तर काही १५ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आले आहे. यावेळी पालकांनी आॅनलाईन पद्धतीने यापूर्वीच प्राप्त झालेल्या अ‍ॅलोटमेंट पत्र सोबत घेऊन स्कुलमध्ये उपस्थित रहायचे आहे.काही शाळांनी प्रवेश देण्याची तयारी दाखविली तरीही त्या शाळांनी अनधिकृतपणे पालकांकडून सुविधांच्या नावांखाली काही रक्कम दिले जाईल असे पालकांकडून लिहून घेत आहेत. मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न असल्याने पालकांनाही याविरूद्ध बोलता येत नाहीये तर अधिकृतपणे शाळांनी प्रवेश देण्याची तयारी दाखविल्याने त्या पालकांना इतर पर्याय उपलब्ध नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी या पालकांची स्थितीझाली आहे. अशा रितीने सुविधांच्या नावे पैसे मागविणे हे चूकच आहे मात्र पालकांचा नाईलाज झाला आहे. - मुकुंद किर्दत, सामाजिक कार्यकर्ते१४ आॅक्टोबर : एसपीएम पब्लिक स्कुल टिळक रोड, परांजपे स्कुल कोथरूड, सह्णाद्री नॅशनल स्कुल, वारजे माळवाडी, मिलेनियम स्कुल, कर्वेनगर या शाळेतील प्रवेश नाकारलेले विद्यार्थी१५ आॅक्टोबर : विखे पाटील मेमोरियल स्कुल गोखलेनगर, एसपीएम इंग्लिश, न्यू इंडिया स्कुल भुसारी कॉलनी, गुरूकुल शिवाजीनगर, भारतीय विद्याभवन शिवाजीनगर, कलमाडी स्कुल कर्वे रस्ता, अभिनव इंग्लिश मिडीयम स्कुल पौड फाटा, ओर्किड बाणेर रस्ता, कलमाडी स्कुल, औंध, सेवासदन एरंडवणे या शाळेतील प्रवेश नाकारलेले विद्यार्थी