शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:09 AM

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा,

मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.एका ८४ वर्ष वयाच्या शेतकºयाला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. त्यांनी मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही.तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षातसाडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर विश्वास नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.मंत्र्यांनी जमीनखरेदी केलीच कशी?धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकºयाने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का? असा सवाल करुन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन कशी खरेदी करू शकतात, असा सवाल विखे पाटील यांनी केला.रावल यांनी खरेदीकेलेल्या जमिनीची चौकशी करा-राष्ट्रवादीसरकारी प्रकल्प असणाºया गावातील जमिनी कवडीमोलाने खरेदी करून त्या महागड्या दरात विकण्याचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा धंदाच असून त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून केली आहे.जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे.- खा. सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी काँग्रेसही आत्महत्या नाही तर हत्या असून त्यास सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्य सरकारला कलंक लावणारा हा प्रकार आहे. शेतकºयांचा आक्रोशही सरकारला ऐकू येत नाही. विकास हवा आहे पण शेतकºयांचे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील तर असा विकास नको.- खा. संजय राऊत, शिवसेनाअन् शासकीय यंत्रणा झाली गतिमानफेरमूल्यांकन सुरू: प्रशासन खडबडून जागेधुळे : विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून विखरण व मेथी शिवारात संपादित केलेल्या १९९ हेक्टर जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. पण सरकारची ही कृती उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी भावना गावकºयांनी व्यक्त केली.जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी आज दिवसभरात या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्याचा अहवाल मंगळवारी मंत्रालयात होणाºया बैठकीत सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाच्या सह्यासुद्धा नाहीत. जमीन मालकाची सही नाही. यावरून कृषी अधिकाºयांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले, हे सिद्ध होत आहे, असा खळबळजनक आरोप धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDharma Patilधर्मा पाटीलfarmer suicideशेतकरी आत्महत्या