मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी, अटकेत असलेले मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यास धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कदम यांस मूतखड्याचा त्रास आहे. त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात नेले जाते. बुधवारीही त्यांना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांच्या सल्ल्यानंतर इस्पितळात पाठविण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट व्हेईकलची सोय न केल्याने कदम यांनी डॉ. घुले यांना धमकावले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कदमांविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणणे, अपमान करून गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरला धमकावल्याचा रमेश कदमांवर गुन्हा दाखल
By admin | Published: February 26, 2016 2:10 AM