मुंबई : राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रिक्त पदे येत्या तीन महिन्यांत भरण्यात येतील, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातील रिक्त पदांबाबतचा मुद्दा भाजपाच्या अनिल सोले यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना तावडे म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयातील पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरली जातात. मात्र, मध्यंतरीच्या काळात एमपीएससीतील गोंधळामुळे पदे भरली गेली नाहीत. संबंधित महाविद्यालयांच्या अधिव्याख्यात्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमातून उमेदवारांची छाननी होेईल. येत्या तीन महिन्यांत ही रिक्त पदे भरली जातील, असे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार
By admin | Published: April 10, 2015 4:16 AM