रोहितप्रसाद तिवारी, अमरावतीसंपूर्ण भारतात मराठी गजलसम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले भीमराव पांचाळे यांच्या आष्टगाव येथील अवघ्या २० वर्षांच्या तरुणाने काही हौशी मित्रमंडळींच्या मदतीने अल्प साधनांच्या आधारे तीन लघुपट निर्माण केले. त्यातील दोन प्रदर्शित झाले. तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मोबाइलच्या साहाय्याने निर्मित पहिल्या चित्रपटाची नोंद झाली. आसिफ खान (२०) हा निर्माता व चित्रपटाचा कथानक आहे. निर्देशन व संकलन (एडीटिंग) त्यानेच केले. इतकेच नव्हे, जाहिरातींचे बॅनरसुद्धा तोच तयार करतो.आसिफ खानची घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. आसिफने चित्रपटनिर्मिती अल्प साधनसामग्रीत पूर्ण केली. मोर्शीला शिकत असताना तेथील तरुणांशी त्याची मैत्री जमली. दरम्यान, व्हीडीओ रेकॉर्डिंग करता यावे, म्हणून त्याने मोबाइल विकत घेतला आणि येथूनच त्याच्या स्वप्नपूर्तीचे प्रयत्न सुरू केले. आसिफच्या या धडपडीची आणि यशाची चर्चा नागपूरच्या विदर्भ फिल्म्स या चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी आसिफला बोलावून घेतले. त्याच्याशी चर्चा केली. त्याने तयार केलेले चित्रपट पाहिले आणि त्यांच्याकरिता चित्रपट निर्माण करण्याची गळ घातली. विदर्भ फिल्मस्च्या बॅनरखाली आसिफने ‘जीव चरित्र - २’ हा दीड तासाचा चित्रपट तयार केला असून, नागपूर येथे प्रदर्शित केला जाणार आहे. मोबाइलद्वारे चित्रीकरणविद्यार्थी अवस्थेत बालभारतीच्या पाठ्य पुस्तकातील ‘स्मशानातील सोनं’ या पाठाची कथा त्याला खूप आवडली. त्याने या कथेवर चक्क मोबाइलने चित्रीकरण करून पहिला ४२ मिनिटांचा चित्रपट सन २०११मध्ये तयार केला. मोबाइलवरच चित्रपटाचे एडीटिंग केले. त्याने चित्रपट तयार करून गावात दाखविला. मोबाइलवरील या पहिल्या चित्रपटाची नोंद ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये चित्रीकरणातील सुस्पष्टतेअभावी होऊ शकली नाही. हँडी कॅमेऱ्यावर निर्मिले अभिमानपहिल्या चित्रपटाच्या यशामुळे प्रेरित होऊन आसिफने हँडी कॅमेरा खरेदी केला. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याने स्त्रीभ्रूणहत्येविरोधात ‘अभिमान’ हा एक तासाचा चित्रपट तयार केला. मुंबईच्या बॉलीवूडच्या तोडीचा हा चित्रपट आसिफने येथीलच एका चित्रपटगृहात प्रदर्शित केला. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला. नागपूरलाही या चित्रपटाने दाद मिळविली.
मोबाइलद्वारे चित्रपटांचे चित्रीकरण!
By admin | Published: January 05, 2015 4:22 AM