शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आता राज्यांमध्ये होणार फिल्म अर्काईव्हस्

By admin | Published: August 24, 2016 1:17 AM

भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा, यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘फिल्म अर्काईव्ह’ सुरू करण्यात येणार

पुणे : भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा, यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘फिल्म अर्काईव्ह’ सुरू करण्यात येणार आहेत. चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने अर्काईव्ह स्थापन करण्याची इच्छा असलेल्या राज्यांना केंद्राकडून आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या यंत्रणा उभारण्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनची पुढील रूपरेषा ठरविण्याबरोबरच उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती मित्तल यांनी पत्रकारांना दिली. मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार सुभाष शर्मा, सहसचिव संजय मूर्ती, चित्रपट विभागाचे महासंचालक मुकेश शर्मा, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा आणि डी. जे. नारायण उपस्थित होते.देशातील एकमेव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे पुण्यात आहे, याच ठिकाणी देशभरासह विदेशातील चित्रपटांचे संकलन करून त्याचे जतन आणि संवर्धन केले जाते. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचेदेखील जतन व्हावे, यासाठी त्या त्या भागातील राज्य सरकारने ‘फिल्म अर्काईव्ह’ स्थापन करण्यासंबंधी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या केरळ आणि कर्नाटक राज्यांकडून असे प्रस्ताव आले आहेत. चित्रपट जतनासाठी प्रादेशिक अर्काईव्ह निर्मित करण्यास इच्छुक राज्यांना केंद्राकडून सहकार्य केले जाईल. तसेच विविध विद्यापीठांसह शैक्षणिक संस्थांमध्ये चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता विद्यापीठांशी चर्चा करण्यात आली आहे. यासाठी ४० विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे. कंपन्यांना सीएसआरनुसार २ टक्के रक्कम सामाजिक कार्यक्रमांसाठी देता येते, कंपन्यांकडूनही चित्रपटांचे जतन करण्यासाठी निधी स्वीकारला जाईल. अर्काईव्हसाठी खासगीकरणाचाही मार्ग आता खुला करण्यात आला असल्याचे मित्तल यांनी स्पष्ट केले. चित्रपटांचे जतन डिजिटल फॉरमॅटमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशविदेशातील विविध भागांमधून चित्रपटांचे संकलन केले जात आहे, कामाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने एनएफएआयमधील कर्मचारीसंख्येत दुपटीने वाढ करण्याबरोबरच कोथरूडच्या एनएफएआयमध्ये नवीन व्हॉल्टस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. >आकाशवाणी आणि पीआयबी कायम राहणार पुण्यातील आकाशवाणीसह पीआयबीचे केंद्र बंद होणार, यावरून वाद निर्माण झाले. मात्र, दोन्ही केंद्र बंद किंवा स्थलांतरित होणार नाहीत. आकाशवाणीच्या पुणे वृत्तविभागासह प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण मित्तल यांनी दिले.