शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

ठाण्यातील ‘त्या’ महिला खेळाडूंचे अखेर निलंबन

By admin | Published: May 17, 2016 4:24 AM

द वेस्टर्न इंडियन फुटबॉल संघटनेने ठाणे संघातील आठ महिला खेळाडूवर निलंबनाची कारवाई केली

मुंबई : ठाणे जिल्हा फुटबॉल संघातील महिला खेळाडूंनी पुरुष छायाचित्रकाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात, द वेस्टर्न इंडियन फुटबॉल संघटनेने ठाणे संघातील आठ महिला खेळाडूवर निलंबनाची कारवाई केली आहे. ठाणे संघातील पाच खेळाडंूवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असून, तीन खेळाडूंवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रशिक्षकावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर, ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेला २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे सामने कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात आले होते. २ मे रोजी झालेल्या धुळे विरुद्ध नागपूर सामन्यात ठाणे संघातली महिला खेळाडूंनी सामना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, द वेस्टर्न इंडियन फुटबॉल संघटना आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याच वेळी छायाचित्रकार पुष्पक शिरवाडकर आपले कर्तव्य बजावत असताना त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. ठाणे संघातील पूजा मोरे, नम्रता ठाकूर, स्नेहल मंचेकर, सुरभी मांजरेकर आणि दीपिका मसूरकर या पाच खेळाडूंवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी तत्काळ लागू करण्यात येत असून, आगामी पाच वर्षांसाठी फुटबॉलसंबंधी कोणत्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी होता येणार नाही. उर्वरित श्रृती नायर, झील ठक्कर, अक्षया वेंकठगिरी यांनाही दोषी ठरवत, त्यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर, ठाणे संघाला २ लाखांचा दंड ठोठावला आहे. शिवाय येत्या १५ दिवसांत कारवाई का करू नये? याबाबत ठाणे संघाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. (प्रतिनिधी)