शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

अखेर इफेड्रीन प्रकरणी 385 पानांचे आरोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल

By admin | Published: June 23, 2016 9:15 PM

कंपनीचा माजी संचालक मनोज जैन याच्यासह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी ठाणे जिल्हा न्यायालयात 385 पानांचे आरोपपत्र दाखल केले

जितेंद्र कालेकरठाणे, दि. 23 - अखेर इफेड्रीनची देश विदेशात तस्करी केल्याप्रकरणी एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा माजी संचालक मनोज जैन याच्यासह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी ठाणे जिल्हा न्यायालयात 385 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. जैन आणि कंपनीचा सल्लागार पुनीत ङ्म्रींगी यांनी कशाप्रकारे सुमारे 100 किलोच्या करोडोंच्या इफेड्रीनची देश विदेशात तस्करी केली, याबाबतचे अनेक जबाब आणि पुरावे या आरोपपत्रत जोडण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली.या आधी 9 जून रोजी याचप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापक राजेंद्र डिमरी याच्यासह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी ठाणो पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जैन, पुनित, नरेंद्र काचा, नवी मुंबईचा हरदिप गिल आणि बाबा धोत्रे या पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. इफेड्रीनची तस्करी करण्यात मोठा वाटा उचलणारा जयमुखी याला अगदी अलिकडे अटक केल्यामुळे त्याच्या संदर्भातील अद्यापही तपास सुरु आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.कंपनीचा तत्कालीन संचालक असलेल्या जैन याने पुनितसह या सर्वाना हाताशी धरुन कंपनीतील इफेड्रीन बाहेर काढले. आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी याच्या मदतीने केनिया तसेच दक्षिण अफ्रिकेत या मालाची तस्करी केली. हवालामार्फत त्यासाठी त्यांनी करोडो रुपये स्विकारले. याशिवाय, मुंबई, ठाणो, नवी मुंबई आणि सोलापूर आदी परिसरात इफेड्रीनची मोठया प्रमाणात बेकायदेशीरपणो तस्करी केली. कंपनीचा सल्लागार पुनित ङ्म्रींगी याने हा माल देश विदेशात तस्करी करण्यासाठी व्यूहरचना केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर हरदिप गिलने हा माल नवी मुंबईच्या स्थानिक मार्केटमध्ये वितरीत केला. यातील नरेंद्र काचाने सोलापूरातील कंपनीतून पाठविलेला माल गुजरातमध्ये ताब्यात घेतला. तिथे त्याने इफेड्रीनवर प्रक्रीया करुन तेच इफेड्रीन केनियात पाठविले. असे आतार्पयत किमान 1क्क् किलो पेक्षा जास्त इफेड्रीन या टोळीने गुजरातमार्फत केनियात पाठविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर बाबा धोत्रेने कंपनीतील माल बाहेर काढयासाठी पुनितला मदत केली. त्यासाठी त्याने काही मजूर आणि टेम्पोही पुरविले. स्वत: संचालक असूनही या सर्वाना कशा प्रकारे हाताशी धरुन मनोजने हजारो कोटींच्या इफेड्रीनची तस्करी करुन औषध विक्रीच्या नावाखाली तरुण पिढीला ड्रग्जच्या जाळयात ओढण्याचे घातक कृत्य केल्याचा या सर्वावर गंभीर आरोप आहे. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.