शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

अखेर बेस्ट भाडेकपात

By admin | Published: June 08, 2016 3:29 AM

महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी बेस्टच्या बस भाड्यात कपात करण्याच्या भाजपाच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आज फसले़

मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी बेस्टच्या बस भाड्यात कपात करण्याच्या भाजपाच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आज फसले़ महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौर पिठासीन अधिकारी बनताच बेस्ट भाडेकपातीचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून आज मंजूर करण्यात आला. त्यामुळे बेस्ट समितीमध्ये मंजूर होऊन तब्बल एक महिना उलटल्यानंतर पालिका महासभेत या भाडेकपातीवर शिक्कामोर्तब आज झाले.त्यानुसार साध्या आणि वातानुकूलित बसपास व वातानुकूलित बसभाड्यात कपात होणार आहे़बस भाड्यात कपात करण्याची घोषणा करीत गेल्या महिन्यात भाजपाने बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला़ त्यानंतर गेला महिनाभर भाडेकपातीचा प्रस्ताव पालिका महासभेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता़ हे भाडेकपातीचे श्रेय भाजपाच्या खिशात जाणार असल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येते़ बस मार्गांमध्ये नव्या टप्प्यांचा समावेश करून भाडे कमी केल्याचे भाजपा भासवत असल्याचाही आरोप करण्यात येत होता़ ही कपात म्हणजे धूळफेक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी आज केला़ मात्र महापौर स्नेहल आंबेकर या दौऱ्यावर असल्याने त्यांच्या गैरहजेरीत उपमहापौर अलका केरकर पिठासीन अधिकारी होत्या़ हीच संधी साधून भाजपाने ही भाडेकपात पालिकेच्या महासभेत आज मंजूर करून घेतली़ त्यानुसार वातानुकूलित बसभाड्यात ५० टक्के कपात, दैनंदिन पास दोनशे रुपयांवरून दीडशे रुपये तर मासिक व त्रैमासिक पासाच्या रकमेत ३० ते १२५ रुपये कपात झाली आहे़ (प्रतिनिधी)>भाडेकपातीमध्ये उत्पन्नात घटबसभाड्यांमध्ये कपात केल्यानंतर दररोज बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात चार लाख ६१ हजार रुपयांची घट होणार आहे़ त्यामुळे या बसगाड्यांचे दररोज २२ हजार ३३५ प्रवासी वाढविणे आवश्यक आहे़ बस पासमध्ये ३० दिवसांऐवजी २२ दिवसांचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात येणार आहेत़ तर त्रैमासिक पास ९०ऐवजी ६६ दिवसांचा असणार आहे़ मासिक व त्रैमासिक बसगाड्यांच्या भाड्यात कपात केल्यामुळे दररोज चार लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे या मार्गावर दररोज ५५५ जादा प्रवासी मिळण्याची गरज आहे़ वातानुकूलित बसगाड्यांचा दैनंदिन पास दोनशे रुपयांऐवजी दीडशे रुपये, मासिक बसपास ४८००वरून ३३०० रुपये तर त्रैमासिक पास ९९०० रुपयांचा असणार आहे़ या भाडेकपातीमुळे एक लाख ६० हजार रुपये उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे वातानुकूलित बसगाड्यांचे आणखी २४०० प्रवासी वाढविण्याची गरज आहे़