पनवेल : प्रशांत ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून, मंगळवारी 23 सप्टेंबरला ते आपल्या समर्थकांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपावासी होणार आहेत. या वेळी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, भाजपाचे राज्यातील सर्व बडे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिली. या वेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.
पनवेल नगरपालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज मैदानावर पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सुमारे 1क् हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, या कार्यक्रमाची तयारी गेल्या दोन दिवसांपासून जोरदारपणो सुरू आहे.
2क्क्4 साली पालिकेच्या मैदानावरच रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या 1क् वर्षात राजकारणात चांगले यश संपादन केल्यानंतर अतिशय प्रतिष्ठेचा केलेला टोलचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही म्हणून ठाकूर त्याच जागेवर भाजपावासी होणार आहेत. याच दिवशी प्रशांत यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडला असल्याचे बोलले जात आहे. महायुतीने टोलमुक्त महाराष्ट्र करू ही घोषणा केली आहे. त्यामुळे खारघरमधील टोलनाक्याचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही मिळाल्यानंतर आम्ही भाजपात प्रवेश करीत असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
ठेका घेण्यासाठी भाजपात चाललो नाही
विमानतळाचा ठेका याकरिता भाजपात प्रवेश करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या आरोपाचे ठाकूर यांनी आज खंडन केले. आपण 1976 सालापासून उद्योजक म्हणून काम करीत आहोत. 2क्क्4 सालार्पयत शेतकरी कामगार पक्षात असतानाही माङया कंपनीला विविध कामे मिळाली. जे.एम. म्हात्रे आज शेका पक्षात आहेत, तरीसुद्धा त्यांना ठेके मिळत आहेत. त्याकरिता पक्ष बदली करण्याचा आवश्यकता नाही. नामांकित कंपनीला कामेही मिळतच राहतात, मग मालक कोणत्याही पक्षात असो. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला नाही म्हणून पक्षाचा त्याग केला असल्याचे स्पष्टीकरण ठाकूर यांनी या वेळी दिले.
प्रशांत ठाकूर यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. अनेक पक्षांकडून निमंत्रण आले, त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचाही समावेश होता. तुम्ही पुन्हा स्वगृही परता, प्रशांतला पनवेलमधून उमेदवारी देऊ, असे शेकापचे नेते म्हणत होते. पण मी स्पष्ट शब्दांत नकार दिला, असा गौप्यस्फोट रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला.