मुंबई : अनेक वर्षांपासून वापरातील गाड्या नादुरुस्त अवस्थेत असल्याने, राज्य परिवहन वाहतूक विभागाला ६ नव्या जीप घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. गृहविभागाने त्यासाठी ३० लाखांचा निधी खर्च करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रस्ताव विभागाकडे प्रलंबित होता, असे अधिका-यांकडून सांगण्यात आले.राज्य सरकारकडून नियमाचे उल्लंघन करणा-यावर कारवाई करत, महसूल मिळविणे आणि मोटार वाहन अधिनियम १९८८, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ व मुंबई मोटार वाहन कर अधिनियम १९५८ मधील तरतुदींची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी, विविध प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, सीमा तपासणी नाके व अधिकाºयांना वाहने पुरविण्यात आलेली आहेत.मात्र, त्यापैकी ३३ नादुरुस्तजुन्या गाड्यांचा खर्च अवाजवी असल्याने त्या कायमस्वरूपी रद्द कराव्यात आणि त्या बदल्यात ६ नवीन जीप घेण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन मंडळाकडून गेल्या वर्षी १२ मे रोजी गृहविभागाला सादर करण्यात आला. त्यासाठी ३० लाख खर्च अपेक्षित असून, या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
अखेर ‘आरटीओ’ला मिळणार नव्या ६ जीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 5:27 AM