ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. 23- काँग्रेस कार्यकर्ते संदीप सावंत मारहाणप्रकरणी नारायण राणेंचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेड सेशन्स कोर्टानं 15 हजारांच्या जात मुचलक्यावर निलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
रत्नागिरीत मराठा आरक्षण मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल राणे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.
मात्र निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले होते. संदीपने मागितलेले पैसे मी न दिल्यानं त्यानं माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगत निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळले होते.