शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

...अखेर वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

By admin | Published: May 18, 2017 11:58 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रहदारीचा असलेला पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 18 -  मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रहदारीचा असलेला वर्सोवा पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जवळपास 4 दिवस या पुलाची दुरुस्ती सुरू होती. गेल्या रविवारपासून पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. हा पूल चार दिवस बंद ठेवण्यात आल्यानं मुंबईकडे जाणारी वाहने मनोर नाका आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत. जुन्या वर्सोवा पुलाला तडे गेल्याने 24 डिसेंबर 2013 पासून हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी एक गर्डर बदलून हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर 2016ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पुलावरून ऑक्टोबर महिन्यापासून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यासाठी एकदिशा मार्ग सुरू ठेवण्यात आला. एकेरी वाहतूक 20 मिनिटे सुरू ठेवली जात असल्याने सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडीने वाहनचालकांना त्रस्त केले आहे. 
या पुलावरून किती वजनाची वाहने जाऊ शकतात, याची तपासणी केली गेली आहे. एकाच पुलावरून वाहतूक सुरू ठेवल्यामुळे रविवारपासून मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सध्या अवजड वाहने मनोर आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली असून, आता ती वर्सोवा पुलावरूनही धावू शकतात. असे असले तरी सध्या हायववेर 10-10 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, जुन्या पुलाला तडे गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 जून 2014 पासून 15 टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनाही बंदीचे आदेश दिलेले आहेत. तरीही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप नेत्यांनी आणि स्थानिकांनी केला आहे.