नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 65 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये आधीच्या 21 मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असून 20 तरी नवीन चेहरे असण्याची शक्यता आहे. मात्र, रामदास आठवले मंत्रिपदासाठी शहांच्या फोनची वाट पाहत होते. अखेर आठवलेंना शहांचा फोन आला असून अद्याप मंत्रीपदाबाबत माहिती समोर आलेली नाही.
रामदास आठवलेंना मंत्रीपद मिळणार या आशेने सकाळपासून हार-तुरे घेऊन कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत होते. मात्र, आठवलेंना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा फोन न आल्याने या आशेवर विरजण पडल्याचे जाणवत होते.
यामुळे आठवले यांनी मोदींना निवडून आणण्यासाठी देशभरातील दलित मतांना भाजपाकडे वळविले आहे. यामुळे मोदी माझ्या नावाचा विचार मंत्री पदासाठी करतील. अमित शहा यांच्या फोनची वाट पाहत आहे. राम विलास पासवान, अनुप्रिया पटेल यांच्यासह शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचे नाव समोर आले आहे. यामुळे मलाही देशाची सेवा करण्याची संधी मिळेल, असे काहीसे नाराजीचे वक्तव्य केले होते.