मातोश्रीवर येण्यास भाग पाडले : शिवसेनेकडून शहांना तीन फोन, दबावतंत्रही आले फळास
संदीप प्रधान - मुंबई
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडावी याकरिता शिवसेनेकडून एक-दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा फोन आल्यामुळे अखेर शहा यांनी वाकडी वाट करून जाण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शहा यांच्या भेटीकरिता रंगशारदामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येण्यास भाग पाडण्याची भाजपाच्या स्थानिक नेत्यांची खेळी यशस्वी झाली नाही याचे समाधान अखेर शिवसेनेला लाभले. मात्र सोशल मीडिया आणि पोस्टरबाजी यातून परस्परांना ‘शहाणो’ होण्याचे धडे देताना झालेली धुळवड दोन्ही पक्षांच्या कार्यकत्र्यामध्ये तणाव निर्माण करून गेली.
शहा यांनी मातोश्रीवर जाऊ नये व लालकृष्ण अडवाणींच्या अपमानाचा वचपा काढावा हाच या खेळीमागील हेतू होता. भाजपाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्यामुळे शिवसेनेलाही चेव चढला. कुठल्याही परिस्थितीत शहा यांना मातोश्रीवर येण्यास भाग पाडायचे, असे ठरले. त्यामुळे सर्वप्रथम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शहा यांची भेट घेऊन त्यांना केंद्रात रालोआची सत्ता असल्याची आठवण करून दिली.
अमित शहा यांनी गुरुवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणूक रणनीतीबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवरून दूर करण्याकरिता युतीच्या कार्यकत्र्यानी गाफील न राहता प्रयत्न करण्याचे उभय नेत्यांमध्ये ठरले. -वृत्त/कक
..तर मुख्यमंत्री पदापासून दूर जावे लागेल
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे 23 खासदार निवडून आले. शिवसेनेला झुकवण्याची व जास्त जागा पदरात पाडून घेण्याची हीच वेळ असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे मत आहे.मात्र या दबावाला आता बळी पडलो व जागा वाढवून दिल्या तर भविष्यात मुख्यमंत्रिपदापासून दूर जावे लागेल, अशी भीती सेनेला वाटते. त्यामुळे तेही भाजपाच्या दबावतंत्रला विरोध करीत आहेत.
..म्हणून मातोश्रीवर : युतीतील तणाव दूर करण्यासाठी सेना दोन पावले मागे घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यावर आता मातोश्रीवर जाण्याचे टाळणो शहा व भाजपाच्या नेत्यांना अशक्य झाले. शिवाय शहांनी मातोश्री भेट टाळली तर चुकीचा संदेश जाईल, असे मत भाजपाच्या नेत्यांचे झाले.
..अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र : शहा यांची मातोश्री भेट व त्यांच्या स्वागताकरिता मुंबईत भाजपाकडून लागलेली ‘अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र’ ही पोस्टर्स किंवा ‘शहाणा हो, हा महाराष्ट्र साहेबांचा आहे’ हे शिवसेनेकडून सोशल मीडियावर फिरलेले संदेश हा त्याच परस्परांवरील व्यापक दबावतंत्रचा एक भाग असल्याचे बोलले जाते.