मुंबई : नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या विशेष बैठकीचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी यासंबंधी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने या बैठकीला स्थगिती दिली नसल्याचे समजते. परिणामी, नियामक मंडळाच्या सदस्यांनी ठरविलेली ही बैठक होणार आहे.नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली विशेष बैठक घटनाबाह्य असून, त्यावर स्थगिती आणावी यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यात १८ फेब्रुवारीच्या बैठकीला न्यायालयाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी नियामक मंडळाच्या सदस्यांनी आयोजित केलेली बैठक होणार आहे. आता नियामक मंडळाच्या सदस्यांच्या या बैठकीत नक्की कोणते निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विशेष बैठकीला आक्षेप नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली विशेष बैठक घटनाबाह्य असून, त्यावर स्थगिती आणावी यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.